esakal | प्रेरणादायी! 20 वर्षाचा क्लेन पाच देशांच्या सीमा पार करत ब्रिटनमधून पोहोचला ग्रीसला
sakal

बोलून बातमी शोधा

klein.png

कोरोना विषाणू महामारी आणि टाळेबंदीदरम्यान लोकांनी कशाप्रकारे आपलं घर गाठलं याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. अशीच गोष्ट आहे ग्रीसहून स्कॉटलॅंडमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या 20 वर्षीय क्लेन पापादिमित्रियो याची.

प्रेरणादायी! 20 वर्षाचा क्लेन पाच देशांच्या सीमा पार करत ब्रिटनमधून पोहोचला ग्रीसला

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

लंडन- कोरोना विषाणू महामारी आणि टाळेबंदीदरम्यान लोकांनी कशाप्रकारे आपलं घर गाठलं याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. अशीच गोष्ट आहे ग्रीसहून स्कॉटलॅंडमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या 20 वर्षीय क्लेन पापादिमित्रियो याची. क्लेन टाळेबंदीमुळे कित्येक दिवस स्कॉटलँडमध्ये अडकला होता. त्याला आई-वडीलांची आठवण येत असल्याने त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण बंद होते, अशावेळी क्लेनने मदत घेतली सायकलची.  क्लेनने तब्बल 2000 किलोमीटर अंतर आणि पाच देशांच्या सीमा पार करत 46 व्या दिवशी आपलं घर गाठलं.

ग्राहक संरक्षण कायदा 20 जूलैला लागू होण्याची शक्यता; पहिल्यांदाच मिळणार...
क्लेन अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. टाळेबंदीमुळे शाळा, कॉलेज आणि विद्यापीठे सर्वकाही बंद होते. अशावेळी त्याला घराची आठवण येऊ लागली. त्यामुळे त्याने सायकलवरुनच घरी निघण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याला वाटलं तेवढा हा प्रवास सोपा नव्हता. कुठे थांबायचं, कुठे राहायचं अशे प्रश्व त्याला भेडसावू लागले. सतत बदलणारे वातावरण आणि रस्त्यांची चढ उतार यामुळे तो त्रस्त झाला होता. त्याला प्रवासाच्या पहिल्याच दिवशी रडू आले. सुदैवाने त्याला एका तरुणाने मदत केली आणि त्याला राहण्याचे ठिकाण सांगितले.

पहिल्या दिवसानंतर क्लेन याचा आत्मविश्वास वाढला. त्याने पहिल्या दिवशी केवळ 75 किलोमीटर अंतर पार केलं होतं. त्यानंतर त्याने दररोज सरासरी 125 किलोमीटर अंतर पार केले. क्लेनला ब्रिटनमधून नेदरलँडला जायचं होतं. येथे त्याने काही प्रवास सायकल जहाजेवर ठेवून केला. त्यानंतर तो जर्मनीत पोहोचला. येथे तो आपल्या एका मित्राजवळ थांबला. येथे त्याने कित्येक दिवसानंतर पहिल्यांदा अंघोळ केली. पुढच्या प्रवासात त्याला कोरोना महामारीमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्याला कोणीही घरात घ्यायला तयार झाले नाही. त्यामुळे त्याला रस्त्यावर किंवा बगीच्यामध्ये तंबू ठोकून राहावे लागले. 

महिन्यापूर्वी बांधलेला पूल गेला वाहून; विरोधकांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल
क्लेन अखेर 46 दिवसानंतर ग्रीसमध्ये पोहोचला. त्याने घरी गेल्यागेल्या आपल्या आईवडीलांची गळाभेट घेतली. त्याच्या आईवडिलांनाही आपले अश्रू अनावर झाले होते. क्लेन 27 जूनला आपल्या घरी पोहोचला होता. तेथे त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे क्लेनसह त्याच्या घरच्यांना हायसे वाटले. क्लेनने अत्यंत खडतर परिस्थितीत आपले घरी गाठले होते. या प्रवासाने त्याचे मनोबल प्रचंड वाढल्याचं क्लेन म्हणतो.