कंगना पुन्हा तोंडावर आपटली; रिहानाच्या कामाचं जगभरातून कौतुक

rahian kangana ranaut farmers protest
rahian kangana ranaut farmers protest

नवी दिल्ली - देशातील शेतकरी आंदोलनाला आात परदेशातूनही पाठिंबा मिळत आहे. अमेरिकन पॉप सिंगर रिहाना हिने शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर सोशल मीडियावर इतरही काही हॉलिवूड कलाकारांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. रिहानाच्या ट्विटची अनेक भारतीय सेलेब्रिटी कौतुक करत आहेत. तर अभिनेत्री कंगना रणौतने मात्र टीका केली आहे.

कंगनाने रिहानाला चक्क मूर्ख म्हंटलं आहे. रिहानानंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटींनी शेतकरी आंदोलनाबद्दल ट्विट केलं आहे. अमेरिकन पॉप सिंगर रिहाना ही तिच्या गाण्यांसाठी जितकी ओळखली जाते तितकीच तिची ओळख सामाजिक कार्यांसाठीसुद्धा आहे. कंगना रणौतने ज्या रिहानाला मूर्ख म्हटलं आहे तिचं मात्र जगभरातून कौतुक होत आहे. रिहानाने कोरोना काळात गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. यासाठी तिच्या संस्थेनं भरीव अशी कामगिरी केली आहे. 

रिहानाने 2012 मध्ये क्लारा लॉयनेल फाउंडेशनची स्थापना केली होती. ही  संस्था जगभरात शिक्षण आणि इतर क्षेत्रात काम करत आहे. मार्च 2020 मध्ये रिहानाच्या या फाउंडेशनने कोट्यवधींची मदत केली आहे. कोरोनाशी लढण्यासाठी तिच्या संस्थेनं 50 लाख डॉलर म्हणजेच जवळपास 36 कोटी रुपये दान केले होते. लोकांच्या मदतीसाठी ती स्वत: पुढाकार घेत होती आणि गरजूंना मदत पुरवत होती. 

ट्विटरचे सीईओ जॅक डॉर्सी यांच्यासोबत मिळून कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये घरगुती हिंसाचाराचे बळी पडलेल्या लोकांसाठी तिने मदत केली होती. दोघांनी मिळून 42 लाख डॉलर दान केले होते. यामध्ये 21 लाख डॉलर रिहानाने दिले होते. एवढंच नाही तर तिने मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्यांसाठी 10 लाख डॉलर (जवळपास 7 लाख कोटी) दिले होते. 

बार्बाडोसच्या सेंट मायकेलमध्ये 20 फेब्रुवारी 1988 ला रिहानाचा जन्म झाला. तिचं खरं नाव रॉबिन रिहाना फेंटी असं आहे. रिहानाला अमेरिकन रेकॉर्ड प्रोड्युसर इवान रोजन यांनी संधी दिली होती. तिला डेमो टेप्स रेकॉर्ड करण्यासाठी अमेरिकेत बोलावलं होतं. रिहानाची एकूण संपत्ती 60 कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास 44 अब्ज रुपये इतकी आहे. 

रिहानाने शेतकरी आंदोलनावर कोणीच का बोलत नाही असा प्रश्न विचारला होता. यानंतर कंगना रणौतने रिहानावर टीका करताना म्हटलं होतं की, कोणी याबद्दल बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर दहशतवादी आहेत. ते भारताला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यामुळे आमची शक्ती कमी होऊन चीनने ताबा घ्यावा. गप्प बस मूर्ख, आम्ही तुमच्यासारखा आमचा देश विकत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com