जो बायडन यांचं मंत्रिमंडळ 'डन'; असं झालंय खातेवाटप

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 January 2021

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांचे पर्व संपुष्टात आले असून आता डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन यांनी या पदाची शपथ घेतली आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी डोनाल्ड ट्रम्प यांचे पर्व संपुष्टात आले असून आता डेमोक्रॅटीक पक्षाच्या जो बायडन यांनी या पदाची शपथ घेतली आहे. जगातील सर्वांत प्रबळ महासत्ता असलेल्या अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष म्हणून जोसेफ रॉबिनेट बायडेन (ज्यू.) यांनी बुधवारी सूत्रे स्वीकारली. त्यांच्याबरोबरच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही उपाध्यक्षपद स्वीकारत अमेरिकेच्या इतिहासातील नव्या अध्यायाला सुरुवात केली. डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून विजय मिळविलेल्या ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस यांचा शपथविधी दिमाखदार पद्धतीने झाला. हॅरिस या पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या आहेत. दरवेळी लाखोंच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केवळ अमेरिकी काँग्रेसच्याच सदस्यांना हजर राहण्याची परवानगी होती. 
जाणून घेऊयात कसे असणार आहे बायडन यांचं मंत्रिमंडळ...

हेही वाचा - ड्रॅगनची शेपूट वाकडीच; ट्रम्प प्रशासनातील 28 अधिकाऱ्यांवर चीनने घातली बंदी

बायडेन प्रशासनातील शिलेदार

 • ज्यो बायडेन - अध्यक्ष
 • कमला हॅरिस - उपाध्यक्ष
 • अँटनी ब्लिंकन - परराष्ट्र मंत्री
 • मेरीक गारलँड - ॲटर्नी जनरल
 • जेनेट येलन- अर्थमंत्री
 • जनरल लॉइड ऑस्टिन : संरक्षण मंत्री
 • जिना रेमोंदो : व्यापार मंत्री
 • कॅथरिन तायी : व्यापार प्रतिनिधी
 • ॲवरिल हायेन्स : राष्ट्रीय तपास संस्थेच्या संचालक
 • लिंडा थॉमस ग्रीनफिल्ड : ‘यूएन’मधील राजदूत
 • जॉन केरी : पर्यावरण राजदूत
 • झेवियर बेसेरा : आरोग्य व मानवतावादी सेवा
 • एरिक लँडर : अध्यक्षांचे वैज्ञानिक सल्लागार

सल्लागार

 • माइक डॉनिलॉन : अध्यक्षांचे मुख्य सल्लागार
 • जेक सुलिवन : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार
 • रॉन क्लेन : प्रशासकीय प्रमुख
 • अलेजेंद्रो मायोर्कास : अंतर्गत सुरक्षा मंत्री
 • जेनिफर ग्रॅनहोम : ऊर्जा मंत्री
 • मायकेल रेगन : पर्यावरण संरक्षण संस्था
 • मार्टिन वॉल्श : कामगार मंत्री
 • मिग्वेल कार्डोना : शिक्षण मंत्री
 • पीट बटीगिग : वाहतूक मंत्री

एकीकडे जो  बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदी शपथ घेतली तर दुसऱ्या बाजूला काही तासांतच चीनने ट्रम्प प्रशासनातील काही मंत्र्यांवर प्रतिबंध लावले आहेत. चीनने बुधवारी ट्रम्प प्रशासनातील 28 माजी अधिकाऱ्यांच्या विरोधात बंदी आणली आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीनंतर काही वेळातच चीनने ट्रम्प प्रशासनात परराष्ट्र मंत्री राहिलेल्या माइक पोम्पिओ, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन आणि संयुक्त राष्ट्रातील राजदूत केली क्राफ्ट यांच्यावर प्रवास आणि व्यावसायिक व्यवहार करण्यावर बंदी आणली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: know all about Cabinet of new us president Joe Biden