
पाकिस्तानमध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असणारे भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पुनरावलोकन याचिका (रिव्हूव पेटीशन) दाखल करण्यास नकार दिला असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. याप्रकरणी पाकिस्तानने आता आता यूटर्न घेतला आहे.
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असणारे भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पुनरावलोकन याचिका (रिव्हूव पेटीशन) दाखल करण्यास नकार दिला असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. याप्रकरणी पाकिस्तानने आता आता यूटर्न घेतला आहे. जाधव यांना फाशीच्या शिक्षेविरोधात याचिका दाखल करण्यास पाकिस्तानने परवानगी दिली आहे. जाधव यांनी याचिका दाखल करावी यासाठी आम्हाला विशेष अध्यादेश आणाला लागला, असा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र, पाकिस्तानचा हा सर्व बनाव असल्याचं भारताने म्हटलं आहे.
चीनला चांगली अद्दल घडवली; अमेरिकेकडून भारताचे तोंडभरुन कौतुक
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार योग्य ती पाऊलं उचलली जात असल्याचं पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे दक्षिण आशियातील महानिदेशक जनरल जाहिद हाफिद आणि अतिरिक्त अॅटर्नी जनरल अहमद इरफान यांनी म्हटलं आहे. कुलभूषण जाधव किंवा त्यांचे कायदेशीर प्रतिनिधी किंवा इस्लामाबादमधील भारत सरकारचे काऊंसलर अधिकारी पुनर्विचार याचिका दाखल करु शकतात, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जाधव यांनी पुनरावलोकन याचिका दाखल करण्यास नकार दिला असल्याचं दावा यापूर्वी पाकिस्तानने केला होता. भारताने हा दावा फेटाळत पाकिस्तान ढोंग करत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी भारताकडून दबाव वाढत असल्याचं दिसताच बुधवारी रात्री उशिरा पाकिस्तानने याचिका दाखल करण्यास अनुमती दिली आहे. पाकिस्तानी सरकारने 20 मे रोजी अध्यादेश काढून जाधव किंवा त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधीला 90 दिवसांच्या आत पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मुदत दिली होती. ही मुदत 19 जूलै रोजी संपणार आहे. त्यामुळे जाधव यांना 19 जूलै अगोदर याचिका दाखल करावी लागणार आहे.
कुलभूषण जाधव यांच्यावर एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानी सैन्य न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादाचा आरोप ठेवत फाशीची शिक्षा ठोठावली होती. भारताने जाधव यांच्या शिक्षेला आव्हान देत नेदरलँडच्या हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आणि जाधव यांना तात्काळ काऊंसलर उपलब्ध करुन देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाने दिलेला आदेश लागू करावा यासाठी भारत पाकिस्तानसोबत संपर्क साधून होता.
शाळा लवकरात लवकर सुरु करा,अन्यथा...; ट्रम्प यांचा राज्यांना गंभीर इशारा
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या 42 पानी आदेशात कुलभूषण जाधव यांना दिलेल्या मृत्यूच्या शिक्षेवर स्थगिती देण्यास सांगितले होते. तसेच याबाबत पुनर्विचार करण्यास सांगितले होते. मात्र, पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची आणि जाधव यांना सोडण्याची भारताची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळली होती.