मोठी बातमी! कुलभूषण जाधव यांचा पुनरावलोकन याचिका दाखल करण्यास नकार

वृत्तसंस्था
Wednesday, 8 July 2020

पाकिस्तानमध्ये गुप्तहेरीच्या आरोपाखाली तुरुंगात असणारे भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पुनरावलोकन याचिका (रिव्हू पेटीशन) दाखल करण्यास नकार दिला असल्याचं पाकिस्तानने सांगितलं आहे.

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये गुप्तहेरीच्या आरोपाखाली तुरुंगात असणारे भारतीय नौदलातील सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांनी पुनरावलोकन याचिका (रिव्हू पेटीशन) दाखल करण्यास नकार दिला असल्याचं पाकिस्तानने सांगितलं आहे. पाकिस्तानने 17 जून रोजी  पुनरावलोकन याचिका दाखल करण्यास त्यांना सांगितले होते. मात्र, जाधव यांनी यास नकार दिला आहे. पाकिस्तानने जाधव यांच्यासमोर दुसरा काउंसलर उपलब्ध करुन देण्याची ऑपर ठेवली असल्याचं कळतंय.

खरंच! कोलकाता ते लंडन धावायची बस, 8 हजार किमी असायचा प्रवास
कुलभूषण जाधव यांच्यावर एप्रिल 2017 मध्ये पाकिस्तानी सैन्य न्यायालयाने गुप्तहेरी आणि आतंकवादाचा आरोप ठेवत मृत्यूची शिक्षा दिली होती. भारताने जाधव यांच्या मृत्यूच्या शिक्षेला आव्हान देत पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला सुनावले होते. न्यायालयाने पाकिस्तानला त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा आणि जाधव यांना तात्काळ काऊंसलर उपलब्ध करुन देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाने दिलेला आदेश लागू करावा यासाठी भारत पाकिस्तानसोबत संपर्क साधून होता. 

अकोल्यात सरासरी एक कोरोना बळी, तीन महिन्यांत 90 मृत्यू
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या 42 पानी आदेशात कुलभूषण जाधव यांना दिलेल्या मृत्यूच्या शिक्षेवर स्थगिती देण्यास सांगितले होते. तसेच याबाबत पुनर्विचार करण्यास सांगितले होते. मात्र, पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची आणि जाधव यांना सोडण्याची भारताची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळली होती.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानने जाधव यांच्या प्रकरणी कोणत्याही तडजोडीस नकार दिला होता. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर संविधानात असलेल्या तरतुदीनुसार पाऊल उचलले जाईल, असंही पाकिस्तानने म्हटलं आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kulbhushan Jadhav refuses to file review petition