19 व्या वर्षी बनली होती सर्वात श्रीमंत महिला; बाथरूममधील फोटोमुळे झाली ट्रोल

टीम ई सकाळ
Monday, 18 January 2021

जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी असलेल्या कायली जेनरने फोर्ब्सची सर्वात कमी वयाची अब्जाधीश होण्याचा मानही तिने पटकावला होता. 

कॅलिफोर्निया - कायली जेनर ही हॉलीवूडमधील सर्वात प्रसिद्ध अशा कर्दाशिया-जेनर कुटुंबाचा एक भाग आहे. जगातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी असलेल्या कायली जेनरने फोर्ब्सची सर्वात कमी वयाची अब्जाधीश होण्याचा मानही तिने पटकावला होता. सोशल मीडियावर सक्रीय असणारी कायली सतत काही ना काही अपड़ेट करत असते. तिच्या याच अपडेटचा फटका आता तिला बसला आहे. एक फोटो शेअर केल्यानं तिला ट्रोल केलं जातंय.

कायलीने ट्विटरवर तिच्या बाथरुममधला एक फोटो शेअर केला होता. इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिने हा फोटो लावला होता. बाथरुममधला फोटो असला तरी त्यात कोणी व्यक्ती वगैरे नव्हती तरीदेखील तिला ट्रोल करण्यात येतं. कायलीने शेअऱ केलेल्या फोटोत बाथरुम आणि त्यात शॉवर दिसत आहे. शॉवर सुरु असून त्यातून पाणी सुरू आहे. सोशल मीडियावर हा फोटो शेअऱ होताच त्यात शॉवरमधून वाहणाऱ्या पाण्यावरून ती ट्रोल झाली. 

युजर्सनी म्हटलं की, 35 मिलियन डॉलर्सच्या अलिशान घरामध्ये राहत असूनही कायली जेनरच्या घरामध्ये सर्वसामान्य नागरिकाच्या घरात ज्या प्रेशरनं पाणी येतं तसंच पाणी येत आहे. तर काही युजर्सनी म्हटलं की यापेक्षा जास्त चांगल्या प्रेशरनं आमच्या घरी पाणी येतं. 

एका युजरने म्हटलं की, सर्वसामान्य लोकांप्रमाणेच कायली जेनरला स्लो इंटरनेटसारखा प्रॉब्लेम येत असेल की नाही याचा विचार करत होतो पण आता त्यांच्या शॉवरचा फोटो पाहून वाटतं की त्यांनाही प्रॉब्लेम येत असेल. 

हे वाचा - शाळा, कॉलेज पुन्हा बंद होणार? केंद्र सरकारने केला खुलासा

कायली जेनर सोशल मीडियावर याआधीही ट्रोल झाली आहे. कायली तिचे फोटो, मेकअप, ट्रान्सफर्मेशन यासह अनेक गोष्टींमुळे ट्रोल झाली होती. कायली ही किम कर्दाशियाची लहान बहीण आहे. सध्या 23 वर्षांची असलेली कायली जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहे. मेकअप लाइन कायली कॉस्मेटिक्सची कोफाउंडर आणि मालक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kylie-jenner-trolled on-twitter-after sharing bathroom image