किर्गिझस्तानमध्ये विमान कोसळून 32 ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

इस्तांबूलच्या दिशेने हे विमान जात होते. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली होती, यामुळे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बिष्केक - किर्गिझस्तानची राजधानी बिष्केकपासून काही अंतरावर कार्गो विमान घरांवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 32 जण ठार झाले आहेत.  

हाँगकाँगहून निघालेले तुर्किश कार्गो विमान बिष्केकपासून दक्षिणकडे असलेल्या एका गावातील घरावर कोसळले. मृतांमध्ये विमानातील 17 जणांचा समावेश असून, गावातील नागरिक अधिक मृत्यूमुखी पडले आहेत. मानस विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही अंतरावर हे विमान कोसळले. 

इस्तांबूलच्या दिशेने हे विमान जात होते. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली होती, यामुळे अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातामुळे अनेक घरांचे नुकसान झाले.
 

Web Title: Kyrgyzstan Health Ministry says cargo plane crash kills 32

टॅग्स