मित्तल यांची हार्वर्ड विद्यापीठाला अडीच कोटी डॉलरची देणगी

वृत्तसंस्था
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पहिल्या नागरिकीकरणापासून जगाच्या विकासात दक्षिण आशियाने महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका पार पाडली आहे. या विभागाचा इतिहास आणि पैलू पूर्णपणे समजून घेऊन आपल्याला भविष्याला आकार देता येईल.
- लक्ष्मी मित्तल, अध्यक्ष, आर्सेलर मित्तल समूह

वॉशिंग्टन - उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी हार्वर्ड विद्यापीठाला अडीच कोटी डॉलरची देणगी दिली आहे. विद्यापीठातील "साउथ एशिया इन्स्टिट्यूट'साठी या देणगीचा वापर करण्यात येणार आहे. या इन्स्टिट्यूटचे नामकरण आता "लक्ष्मी मित्तल साउथ एशिया इन्स्टिट्यूट' असे करण्यात आले आहे.

या संस्थेची स्थापना 2003 मध्ये झाली. ही संस्था 2010 मध्ये आंतरविद्याशाखीय बनली. या संस्थेत दक्षिण आशियातील भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, म्यानमार, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांशी निगडित संशोधन होते. या संस्थेचे संचालक भारतीय वंशाचे तरुण खन्ना आहेत. मित्तल यांच्या देणगीमुळे दक्षिण आशियाशी विद्यापीठ अधिक जोडले जाणार असून, दक्षिण आशियाशी निगडित संशोधनाला वाव मिळणार आहे. दक्षिण आशियाचे जगाशी निगडित पैलू येथे अभ्यासले जातात; तसेच दक्षिण आशियातील भाषा आणि अन्य विषय शिकण्यासाठी मदत केली जाते.

पहिल्या नागरिकीकरणापासून जगाच्या विकासात दक्षिण आशियाने महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका पार पाडली आहे. या विभागाचा इतिहास आणि पैलू पूर्णपणे समजून घेऊन आपल्याला भविष्याला आकार देता येईल.
- लक्ष्मी मित्तल, अध्यक्ष, आर्सेलर मित्तल समूह

Web Title: Lakshmi Mittal