म्यानमारमध्ये भूस्खलनात १६२ जणांचा मृत्यू

पीटीआय
शुक्रवार, 3 जुलै 2020

सरकारकडून माहिती लपविण्याचा प्रयत्न
भूस्खलनाची घटना घडल्यानंतर म्यानमार सरकारने ५० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. मात्र, दुपारपर्यंत ९९ जणांचे मृतदेह अग्निशामक दलाने बाहेर काढले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट करून ११३ जण गेल्याचे सांगितले. त्यामुळे म्यानमार सरकारने स्थानिक अग्निशामक दलाला यावरून चांगलेच झापले.

यंगून - म्यानमारच्या उत्तरेकडे हिऱ्याच्या खाणीत भूस्खलनामुळे १६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५४ जण जखमी झाले आहेत. काचीन राज्यातील हापकांतमध्ये गुरूवारी ही घटना घडल्याचे म्यानमारच्या माहिती व सूचना खात्याने सांगितले. हा भाग चीनच्या सीमेपासून जवळ आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

म्यानमारचे सर्वात मोठे शहर असलेल्या यंगूनमध्ये ही खाण ९५० किलोमीटर परिसरात व्यापलेली आहे. तसेच हे ठिकाण जगातील सर्वात मोठे हिऱ्यांच्या उद्योगाचे केंद्र आहे. सुरूवातीला एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार येथून २०० जण बेपत्ता झाल्याचे आणि ५० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतर स्थानिक अग्निशामक विभागाने फेसबुकवरून अधिकृतपणे ११३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृतांचा आकडा आता १६२ वर पोचला आहे. या घटनास्थळाचा एक थरारक व्हिडिओ व्हायरल झाला असून, एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि अनेकजण भूस्खलनात येथील कर्मचारी गाडले गेले. याठिकाणी कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.

व्लादिमिर पुतीन यांच्यासाठी राज्यघटनेतच बदल; 2036 पर्यंत सत्तेवर?

दुपारपर्यंत ९९ मृतदेह येथून बाहेर काढण्यात आले होते.  ही घटना जोराच्या पावसामुळे घडली. याठिकाणी दरवर्षी स्थलांतरित कामगारांकडून कमी मोबदल्यात खाणीतील कामे करून घेतली जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landslide kills 162 in Myanmar