प्रशांत विभागात चीनला शह देण्यासाठी अमेरिकेची मोठी तरतूद

lloyd austin
lloyd austin

प्रशांत विभागात चीनला शह
नवी आघाडी उघडण्यासाठी अमेरिकेची मोठी तरतूद
वॉशिंग्टन - चीनमधील वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी अमेरिका २.२ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून प्रशांत महासागर प्रदेशात नवी आघाडी उघडणार आहे. अमेरिकेचा विरोध आणि संरक्षण धोरण अधिक मजबूत करणे हा या मागील उद्देश आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंद -प्रशांत प्रदेशात भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपानसारख्या मित्रदेशांबरोबर सहकार्य आणि युद्धसज्जता वाढविण्यासाठीही या आघाडीचा उपयोग केला जाणार आहे. 

अमेरिकेच्या संरक्षण खर्चात २.२ अब्ज डॉलरची तरतूद या आघाडीसाठी करण्यात आली आहे. यामुळे चीनला योग्य प्रकारे संदेश जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकी सिनेटच्या संरक्षण विषयक समितीने संरक्षण खर्चाबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या मागणीपेक्षा साडे तेरा कोटी डॉलर अधिक मंजूर करण्यात आले आहेत.

हाँगकाँगमधील स्वायत्ततेवर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या १४ चिनी अधिकाऱ्यांवर अमेरिकेने आर्थिक आणि प्रवास निर्बंध जारी केले आहेत. या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अमेरिकेत प्रवेश करता येणार नाही, तसेच त्यांची अमेरिकेत काही संपत्ती असल्यास ती गोठवण्यात आली आहे.  अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी आज हे निर्बंध जारी केले. चीनच्या ज्या १४ अधिकाऱ्यांवर आज निर्बंध जारी करण्यात आले, ते सर्व जण स्थायी समितीचे सदस्य आहेत. गेल्या वर्षी स्थायी समितीनेच हाँगकाँगसाठीचा राष्ट्रीय सुरक्षा कायदा मंजूर केला होता.

चीनचा संताप
बीजिंग :
चिनी अधिकाऱ्यांवर निर्बंध घालण्याच्या आणि तैवानला शस्त्रविक्री करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर चीनने संताप व्यक्त केला आहे. हे निर्बंध तातडीने हटवावेत, अशी मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. तैवानला शस्त्रविक्री करण्याचा निर्णयही चुकीचा असून हा भाग आमचाच भाग असल्याचा दावा पुन्हा एकदा केला आहे. तैवानने मात्र अमेरिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com