जगातील सर्वांत मोठा समुद्री पूल 

पीटीआय
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

बीजिंग (पीटीआय) : चीनमधील शहर झुहाईला हाँगकाँग आणि मकाऊला जोडणाऱ्या जगातील सर्वांत लांब 55 किलोमीटरचा समुद्री पूल बुधवार (ता.24) पासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. सुमारे दीड लाख कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाचे काम 2009 पासून सुरू झाले होते. हा पूल हॉंगकॉंगला चीनचे दक्षिण शहर झुहाई आणि मकाऊच्या गॅमलिंग एन्क्‍लेव्हला जोडण्यात आला आहे. नऊ वर्षांपासून तयार होणारा पूल तयार करण्यासाठी आयफेल टॉवरच्या तुलनेत 60 पट अधिक लोखंड लागले आहे. 

पुलाची वैशिष्ट्ये 
डिसेंबर 2009 पासून काम सुरू 
डिसेंबर 2016 मध्ये पुलाचे काम पूर्ण 
खर्च : वीस अब्ज डॉलर 
पाण्याखालून बोगद्याचा समावेश 
अकरा शहरे जोडली जाणार 
120 वर्षांपर्यंत पुलाचा वापर 
60 टक्‍क्‍यांपर्यंत वेळेची बचत 
प्रवासासाठी विशेष परवान्याची गरज 
पुलावर पायी चालण्यास मनाई 
हाँगकाँग ते झुहाईतील अंतर तीन तासांवरून 30 मिनिटांवर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The largest marine pool in the world