लष्करे तैयबाचा कमांडर अबू उक्शाला अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 21 जून 2016

जम्मू - लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर अबू उक्शा याला सोमवारी सायंकाळी अटक करण्यात भारतीय सुरक्षा रक्षकांना यश आले. 

कुपवाडा शहरातील लोलाब भागातील सोगम मार्केटमधून सापळा रचून अबू उक्शा याला सोमवारी सायंकाळी सात वाजता अटक करण्यात आली. भारतीय सुरक्षा यंत्रणेचे हे मोठे यश मानले जात आहे. पाकिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या लष्करे तैयबाचा दहशतवादी याठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी संयुक्तरित्या मोहिम राबवत त्याला ताब्यात घेतले. 

उक्शा याच्याजवळ 38 हजार रुपये रोख आणि एक ग्रेनेड सापडले आहे. दहशतवादी कारवायांबाबत उक्शा याच्याकडून मोठा खुलासा होण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांकडून वर्तविण्यात येत आहे. उक्शाला अटक केल्यानंतर काही वेळातच सीमेवर गोळीबाराची घटना घडली आहे. तो काश्मीरमध्ये कसा पोहचला, याचाही शोध घेण्यात येत आहे.

Web Title: lashkar-e-taiba