सौदी महिलांना गाडी चालवू द्या: सौदी राजपुत्र

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

तलील हे पुरुषसत्ताक राज्यव्यवस्था असलेल्या सौदी अरेबियामधील महिलांच्या हक्‍कांचे पुरस्कर्ते मानले जातात. महिलांच्या हक्‍कांना त्यांनी कायमच पाठिंबा दिला आहे. महिलांना गाडी चालवू न देणे हे आर्थिकदृष्ट्‌याही परवडणारे नसल्याचे मत तलील यांनी व्यक्‍त केले आहे.

रियाध - सौदी अरेबियामध्ये महिलांवर गाडी चालविण्यासंदर्भात लादण्यात आलेली बंदी तत्काळ हटवावयास हवी, असे मत येथील प्रभावशाली राजपुत्र असलेल्या अल वालीद बीन तलाल यांनी व्यक्त केले आहे.

"यासंदर्भातील चर्चा आता थांबवा. महिलांनी गाडी चालविण्याची वेळ आता आली आहे,' अशा आशयाचे ट्‌विट तलाल यांनी केले आहे. तलाल यांच्याकडे कुठलेली राजकीय पद नसले; तरी ते सौदी राज्यामधील आर्थिकदृष्ट्‌या अत्यंत संवेदनशील असलेल्या "होल्डिंग कंपनी'चे अध्यक्ष आहेत. तलील हे पुरुषसत्ताक राज्यव्यवस्था असलेल्या सौदी अरेबियामधील महिलांच्या हक्‍कांचे पुरस्कर्ते मानले जातात. महिलांच्या हक्‍कांना त्यांनी कायमच पाठिंबा दिला आहे.

महिलांना गाडी चालविण्यास मनाई करणारा सौदी अरेबिया हा जगातील एकमेव देश आहे. महिलांना गाडी चालवू न देणे हे आर्थिकदृष्ट्‌याही परवडणारे नसल्याचे मत तलील यांनी व्यक्‍त केले आहे. महिलांना गाडी चालवू न देण्यामुळे परकीय चालकांना काम द्‌यावे लागते व यामधून सौदी अरेबियाची अब्जावधी डॉलर्सची गंगाजळी नष्ट होते, असे तलील म्हणाले.

Web Title: Let women drive, says Saudi prince