कमाल झाली! चॉकलेट ठिक आहे पण बिअरही जीवनावश्यक!

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

चॉकलेट उत्पादनामध्ये बेल्जियम जगात भारी आहे. तेथील सरकारने लॉकडाऊनमध्येही चॉकलेट शॉप खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे.

कोरोनाच्या काळात जगभरातील अनेक देशात लॉकडाऊनची नामुष्की ओढावली आहे. वेगवेगळ्या देशात लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या विक्रीलाच परवानगी देण्यात येते. याच नियमावलीप्रमाणे बेल्जियम सरकारने एका आश्चर्यकारक निर्णय घेतलाय. लॉकडाऊनच्या काळात निर्बंध घातलेल्या वस्तूंमधून त्यांनी चॉकलेट आणि बिअरच्या विक्रीला परवानगी दिली आहे. चॉकलेट आणि बिअर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंमध्ये करण्यात आला आहे. 

चॉकलेट उत्पादनामध्ये बेल्जियम जगात भारी आहे. तेथील सरकारने लॉकडाऊनमध्येही चॉकलेट शॉप खुले ठेवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर Neuhaus या चॉकलेट कंपनीच्या CEO नी चॉकलेट ही देशाच्या संस्कृतीचे अविभाज्य अंग असल्याचे म्हटले आहे. फ्रान्समधील बिअर आणि वाईनच्या संस्कृतीचा दाखला देत त्यांनी चॉकलेट हे बेल्जियममधील  ''joyful product'' आनंद देणारे उत्पादन असल्याचा उल्लेखही केलाय. 

कोरोनापासून वाचण्यासाठी पाणी पिणं पडलं महागात; आयसीयूत व्हावं लागलं दाखल 

चॉकलेटशिवाय बेल्जियम सरकारने लॉकडाउनच्या काळात बिअर शॉपी खुली करण्यालाही परवानगी दिली आहे. जगात सर्वात प्रथम बिअर शॉपी सुरु झाली ती बेल्जियममध्येच. 1980 मध्ये Beer Mania ही जगातील पहिली बिअर शॉपी खुली झाली होती. बेल्जियममध्ये बार खुले करण्यावर निर्बंध घालण्यात आले असले तरी रस्त्या रस्त्यावरील छोटे छोटे बिअर शॉप खुली आहेत. चॉकलेटचा उपयोग कोल्ड आणि हॉट ड्रिंक्समध्ये उपयोग केला जातो. मॅक्सिकोमध्ये सर्वात पहिल्यांदा हॉट ड्रिक्समध्ये चॉकलेटचा वापर करण्यात आला होता.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lifestyle news belgium categorises chocolate and beer as essential items