विजय मल्ल्या यांना लंडनमध्ये अटक

वृत्तसंस्था
मंगळवार, 18 एप्रिल 2017

लंडन: बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून परदेशात पसार झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना युके पोलिसांनी आज (मंगळवार) अटक केली आहे. त्यांना आता वेस्टमिन्स्टर येथील न्यायालयात सादर केले जाणार आहे. या कारवाईमुळे मल्ल्यांना भारतात परत आणण्यासाठी सुरु असलेल्या सरकारच्या प्रयत्नांना लवकरच यश मिळण्याची शक्यता आहे.

बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकवून गेल्यावर्षी मल्ल्या यांनी लंडन गाठले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी भारताने ब्रिटनकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. शिवाय, त्यांना फरारी घोषित करत त्यांचा पासपोर्टदेखील रद्द करण्यात आला होता. 

विजय मल्ल्या यांच्यावर सध्या बँकांचे कर्ज थकविल्यांसदर्भात तसेच इतर अनेक आर्थिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मल्ल्या यांच्याकडे सार्वजनिक बँकांचे 8 हजार 191 कोटी रुपयांचे कर्ज 31 डिसेंबर 2016 पर्यंत थकीत आहे. यातील केवळ 155 कोटी रुपयांचे कर्ज बॅंकांनी मल्ल्या याच्या जप्त मालमत्तांचा लिलाव करून वसूल केले आहे. बॅंका कर्ज वसुलीसाठी मल्ल्या याच्या मालमत्तेच्या लिलावासह सर्व उपाययोजना करत आहेत, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी गेल्या महिन्यात दिली होती.

Web Title: Liquor baron Vijay Mallya arrested in London