Video: पंतगात अडकून मुलगी उडाली अकाशात...

वृत्तसंस्था
Monday, 31 August 2020

पतंग महोत्सवादरम्यान तीन वर्षांची मुलगी पतंगामध्ये अडकून अकाशात उडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने या मुलीचा जीव बचावला आहे.

तैवानः पतंग महोत्सवादरम्यान तीन वर्षांची मुलगी पतंगामध्ये अडकून अकाशात उडाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने या मुलीचा जीव बचावला आहे.

बाप्पाच्या आरतीवर टाळ्या वाजवणारी मांजर व्हायरल...

संबंधित घटना उत्तर तैवानमधील असून, तेथे पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. शिवाय, लहान मुलेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. पतंग उडवत असताना एक तीन वर्षांची मुलगी एका पतंगामध्ये अडकली. पतंगात अडकून ती 100 फूट हवेत उडाली. हवेचा वेगानुसार ती पंतगासोबत उडत होती. नागरिकांनी पतंगाचा दोर खाली खेचल्यामुळे तिला खाली घेण्यात यश आले. या घटनेत मुलीला जखमा झाल्या असून, उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने पतंग महोत्सव बंद केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: little girl was caught by a kite video viral