मला दोन बायका आहेत; पास देता का...

lockdown man asking for permit to visit 2nd wife
lockdown man asking for permit to visit 2nd wife

दुबई: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना घराबाहेर पडता येत नाही. मात्र, घराबाहेर पडण्यासाठी नागरिक विविध कारणे पुढे करत आहेत. एकाने तर चक्क आपल्याला दोन बायका असून, दुसऱया बायकोकडे जाण्यासाठी पास द्यावा, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

गल्फ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, 'दुबई पोलिसांनी एका रेडिओ स्टेशनच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांचे निरसण करण्यासाठी लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी एका व्यक्तीने माझे दोन महिलांशी लग्न झाले आहे. मला एका घरातून दुसऱ्या घरी जाण्यासाठी परवाना मिळू शकेल का?” असा प्रश्न लाइव्ह कार्यक्रमात विचारला. हा प्रश्न ऐकून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आलेले दुबई वाहतूक पोलिसांचे संचालक ब्रिगेडीयर सैफ मुहीर अल् मझरुई यांना हसू आले. मात्र, त्यांनी या प्रश्नाला, परवाना मिळाला नाही हे एका पत्नीला न भेटण्याचे चांगले कारण ठरु शकते, असे मजेशीर उत्तर दिले.'

लाईव्ह कार्यक्रमामध्ये असा प्रश्न विचारल्यामुळे अनेकांना हसू आले. याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. पण, अशा प्रकारचा प्रश्न विचारणारी ही पहिलीच व्यक्ती नसल्याचेही सांगितले. पण, परवाना एकदाच वापरण्यासाठी दिला जातो. त्यामुळे अत्यंत महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडायचे असल्यास परवान्यासाठी अर्ज करता येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमध्येही (युएई) करोनाचे आठ हजारहून अधिक रुग्ण अढळून आले असून, 50 जणांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर देशामधील अनेक भागांमध्ये लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे.

गुड न्यूज! भारतात कोरोनाची पहिली चाचणी यशस्वी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com