c-130 hercules plane
sakal
मॅरिएटा (अमेरिका) - संरक्षण क्षेत्रातील दिग्गज कंपनी लॉकहिड मार्टिनकडून आपल्या संरक्षण दलांसाठी ८० मालवाहतूक विमाने खरेदी करण्याची तयारी भारताकडून सुरू असतानाच, या कंपनीने यासाठी ‘सी-१३० जे’ सुपर हर्क्युलस या विमानाचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच, ही संधी मिळाल्यास अमेरिकेबाहेरील पहिले उत्पादन केंद्र भारतात उभारण्याचे आश्वासनही कंपनीने दिले आहे.