लंडनमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर प्रचार थांबवला

संतोष धायबर
रविवार, 4 जून 2017

लंडन - लंडनमध्ये शनिवारी (ता. 3) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जनजीवन सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्वसामान्य नागरिकांनी आपले दैनंदिन जीवन सुरळीत ठेवून एकाप्रकारे मूकपणाने या हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला आहे. गुरुवारी (ता. 8) जनरल निवडणूक होत असून, सर्वपक्षांनी मिळून प्रचार थांबवला आहे.

लंडन - लंडनमध्ये शनिवारी (ता. 3) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जनजीवन सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असून, सर्वसामान्य नागरिकांनी आपले दैनंदिन जीवन सुरळीत ठेवून एकाप्रकारे मूकपणाने या हल्ल्यांचा निषेध व्यक्त केला आहे. गुरुवारी (ता. 8) जनरल निवडणूक होत असून, सर्वपक्षांनी मिळून प्रचार थांबवला आहे.

लंडनमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये तीन वेळा दहशतवादी हल्ला झाला आहे. शनिवारी (ता. 3) झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 7 ठार तर 48 जण जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे. रस्त्यांवरून पोलिसांच्या वाहनांचा ताफे फिरताना दिसत आहेत. आज (रविवार) सुटी असली तरी नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याला न जुमानता आपले दैनंदिन जीवन सुरळीत ठेवले आहे. नागरिकांनी मूकपणाने या हल्ल्याचा निषेध केला आहे. 

देश प्रथम, निवडणूक नंतर...
गुरुवारी येथे निवडणूक होत आहे. निवडणूक तीन दिवसांवर आली असताना व रविवारची सुटी असल्यामुळे प्रचार शिगेला पोहचला होता. परंतु, दहशतवादी हल्ला झाल्यामुळे सर्व पक्षांनी मिळून प्रचार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देश प्रथम व निवडणूक नंतर असे येथील राजकीय पक्षांनी दाखवून दिले आहे. शिवाय, या हल्ल्याचा सर्व पक्षांनी मिळून निषेध व्यक्त केला आहे.

ओह माय गॉड...
दहशतवादी हल्ल्याची बातमी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून नागरिकांना समजल्यानंतर अनेकांच्या तोंडून 'ओह माय गॉड' हा शब्द बाहेर पडला. हल्ल्याचे वृत्त जाणून घेण्यासाठी अनेकांनी टीव्ही, वृत्तवाहिन्यांची संकेतस्थळांची दालने उघडली. सोशल नेटवर्किंग साईटसह व्हॉट्सऍपवरून नागरिक एकमेकांशी संपर्क साधताना दिसत होती.

पुरे आता पुरे...
दहशतवादी हल्ल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी आप्तकालीन बैठक बोलविली होती. तीन महिन्यांमध्ये तीन वेळा दहशतवादी हल्ला झाल्यामुळे पुरे आता पुरे... एवढेच म्हणत आहे. दहशतवाद्यांचा नायनाट केला जाईल. येथील निवडणूक ठरलेल्या वेळेमध्येच होईल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: London attack: parties suspend campaigning