ब्रिटिश संसद हल्लाप्रकरणी सात जणांना अटक

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 मार्च 2017

लंडन: ब्रिटिश संसदेबाहेर बुधवारी (ता. 22) झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी आज (गुरुवार) लंडन आणि बर्मिंगहॅम येथे छापे घालत सात जणांना अटक केली.

या हल्ल्यात हल्लेखोरांसह चार जणांचा मृत्यू झाला होता, तर 29 जण जखमी झाले होते. अटक केलेल्या सर्वांची चौकशी सुरू असून त्यांच्या कटकारस्थानांची आणि संघटनेच्या कारवायांची माहिती मिळविण्याच्या दृष्टिकोनातून हल्लेखोरांची ओळख अद्याप जाहीर केली नसल्याचे स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक तपासानुसार, हल्लेखोराने जगभरातील दहशतवादापासून प्रभावित होत एकट्यानेच नियोजन करून हा हल्ला घडवून आणला होता. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याला पोलिसांनी त्याच वेळी गोळ्या घालून ठार केले होते.

Web Title: london attack: seven arrested