सागरी पर्यावरणाला प्लॅस्टिकचा वाढता धोका

सागरी पर्यावरणाला प्लॅस्टिकचा वाढता धोका

जगभरात अनेक ठिकाणी समस्या; वापर टाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

लंडन : होंडुरास देशाला लागून असलेल्या कॅरेबियन समुद्रामध्ये प्लॅस्टिक कचऱ्याच्या लांबच लांब पसरलेल्या थरांची काही धक्कादायक छायाचित्रे गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाली. ही छायाचित्रे पाहून पर्यावरणवाद्यांना तर चिंता वाटावीच, पण सामान्य नागरिकांनाही समस्येची जाणीव होईल.

कॅरेबियन समुद्राचे किनारे प्लॅस्टिक कचऱ्याने कसे व्यापले गेले आहेत, हे छायाचित्रांमधून स्पष्टपणे दिसत आहे. प्लॅस्टिक कचऱ्याचा काहीशे मीटर लांबी-रुंदीचा थर बराच काळ साचून त्याचेच एक बेट बनल्यासारखे झाले आहे. या प्लॅस्टिकमुळे परिसरातील सागरी जीवन धोक्‍यात आले आहे. ही परिस्थिती केवळ कॅरेबियन समुद्रात नाही, तर जगभरात अनेक ठिकाणी आहे. पॅसिफिक सागरातील प्लॅस्टिकच्या काही बेटांची मेक्‍सिकोपेक्षाही लांब आहे. कॅनडातील काही कंपन्याही फिलिपिन्सच्या किनाऱ्यावर हजारो टन प्लॅस्टिकचा कचरा टाकत असल्याचे नुकतेच उघड झाल्याने बराच वाद झाला होता. यामध्ये दोन्ही बाजूंचे दलाल पैसे कमावतात आणि पर्यावरणाची मात्र भरून न येण्यासारखी हानी होत आहे.

बराच काळ पाण्यात राहिल्याने प्लॅस्टिकचे बारीक तुकडे होतात आणि ते अन्नसाखळीद्वारे सागरी पक्षी, मासे, कासवे आणि अन्य समुद्री जिवांच्या पोटात जातात. जवळपास 90 टक्के सागरी पक्ष्यांच्या पोटात प्लॅस्टिकचे कण आढळतात.
जगभरात अनेक ठिकाणी प्लॅस्टिकचा कचरा समुद्रात टाकला जातो, हे उघड सत्य आहे. ही जागतिक समस्या बनली आहे. हे सर्व रोखण्यासाळी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्लॅस्टिकचे प्रदूषण रोखण्यासाठी काही उपायदेखील तज्ज्ञांनी सुचविले आहेत. सूती, रेशमी, लोकरी अशासारख्या संपूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून बनलेले कपडे वापरण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून, नेहमी वापरण्यासारख्या कापडाच्या अथवा कागदाच्या पिशव्या वापरणेही योग्य आहे. प्रवासात पाण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्या वापरण्याऐवजी घरूनच बाटलीत पाणी भरून जा, पर्यावरणाची हानी न करणाऱ्याच वस्तू वापरा, असे काही सल्लेही त्यांनी दिले आहेत.

प्लॅस्टिकच्या धोक्‍याची व्याप्ती
30 कोटी टन : जगभरात दरवर्षी तयार होणारे प्लॅस्टिक
12 टक्के : पुनर्प्रक्रिया होणारे प्लॅस्टिक
5 हजार अब्ज : समुद्रात साचलेले प्लॅस्टिकच्या वस्तू. (यामध्ये दर मिनिटाला ट्रकभर वस्तूंची भर पडते.)
80 लाख टन : दरवर्षी कचरा होणारे प्लॅस्टिक
400 वर्षे : प्लॅस्टिकचे विघटन होण्यास लागणारा कालावधी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com