पुढील काळ सहकार्य, सचोटीचा : पवार

लंडनमध्ये ‘ओएमपीईजी’चे वार्षिक संमेलन संपन्न
London OMPEG Annual meeting
London OMPEG Annual meeting

लंडन : पुढील काळामध्ये सहकार्य, सचोटी व कार्यकुशलता यांचे वर्चस्व राहणार आहे, असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केले. ते ओव्हरसीज महाराष्ट्र प्रोफेशनल्स ॲंड एंटरप्रिनर्स ग्रुप (ओएमपीईजी, युके)च्या सहाव्या वार्षिक स्नेहसंमेलनात विशेष अतिथी म्हणून बोलत होते. लंडनमधील हॉटेल रेनिसन्समध्ये हे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. युनिलिव्हर कंपनीचे मुख्य मनुष्यबळ व परिवर्तन अधिकारी नितीन परांजपे तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आभासी पद्धतीने उपस्थित होते.

पवार म्हणाले, की पुढील काळामध्ये सहकार्य, सचोटी व कार्यकुशलता यांचे वर्चस्व राहणार आहे. यासाठीची तयारी, साधन सामग्री व प्रशिक्षण आदींबद्दलही त्यांनी मार्गदर्शन तसेच प्रतिनिधींना सहकार्य करण्याची ग्वाहीही दिली.

लंडनमधील भारतीय उच्च आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकारी लक्ष्मी नारायणन यांनी पवार यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला. प्रतापराव पवार यांच्या हस्ते नितीन परांजपे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राहुल घोलप व रवींद्र गाडगीळ यांनी संस्थेच्या गेल्या सहा वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला.

संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे व्यवसाय, उद्योग व  वैयक्तिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सदस्यांचा सन्मान चिन्ह  देऊन गौरव करण्यात आला. समीर गुजर व राजन शेगुणशी यांनी आभार प्रदर्शन केले.

गडकरी यांचेही मार्गदर्शन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशामार्फत उपस्थितांना संबोधित केले. परदेशस्थ महाराष्ट्रीयन व्यावसायिक व उद्योजक यांना प्रोत्साहन देत त्यांनी भारतातील व्यावसायांशी सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. नितीन परांजपे यांनी भविष्यातील जागतिक व्यवसाय परिस्थिती, त्यापुढील आव्हाने व त्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com