
नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता ब्रिटनमध्येही स्थलांतरांविरोधात आंदोलनाचा भडका उडालाय. शनिवारी लंडनमध्ये अँटि इमिग्रेशन कार्यकर्ता टॉमी रॉबिन्सन यांच्या नेतृत्वाखाली लाखो लोक रस्त्यावर उतरले. लंडनच्या रस्त्यावर आंदोलन सुरू असतानाच अब्जाधीश एलॉन मस्क यांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलंय. त्यांनी म्हटलंय की, आता ब्रिटनमध्येही सत्तांतराची गरज आहे. आंदोलकांकडे दोनच पर्याय आहेत लढा किंवा मरा.