2024 संपून आता नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. या वर्षात जगभरात अनेक महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या आहेत. भारतात नरेंद्र मोदी हे तिस-यांदा पंतप्रधान बनले आहेत . अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेत आले. रशिया-युक्रेन दोन वर्षांनतर सुरुच आहे. तसेच पाकिस्तानमध्ये आणि बांग्लादेशात अराजकता माजली. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक झाली तर बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना निवडणुकीत विजयानंतर काही महिन्यांतच देश सोडावा लागला. तर ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषि सुनक यांना पराभवाचा सामना करावा लागला. अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी सरत्या वर्षात जगभरात घडल्या. त्याचा थोडक्यात घेतलेला आढावा.