भारतातच नाही तर अमेरिकेतही 'जय श्रीराम'; टाईम स्क्वेअरवर झळकणार रामाची 3D प्रतिमा 

Lord ram and Ayodhya Temple Model To Be Displayed At New Yorks Times Square
Lord ram and Ayodhya Temple Model To Be Displayed At New Yorks Times Square

न्यूयॉर्क- 5 ऑगस्ट रोजी भारतात  राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. भारतासोबतच अमेरिकेतही राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळा साजरा केला जाणार आहे. भगवान रामाचा फोटो आणि अयोध्येतील राम मंदिराची 3D प्रतिमा न्यूयॉर्कमधील टाईम स्क्वेअरवर 5 ऑगस्ट रोजी दाखवले जाणार आहे. अमेरिकेतील हिंदू समाजाचे नेते आणि अमेरिकन इंडिया पब्लिक अफेर कमीटीचे अध्यक्ष जगदीश शेहानी यांनी बुधवारी याची माहिती दिली आहे. 

राम मंदिराचे पुजारी आणि सुरक्षेसाठी तैनात 16 पोलिसांना कोरोना
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्ट रोजी भारतात राम मंदिराचे भूमिपूजन करतील. हा ऐतिहासिक क्षण आम्ही अमेरिकेत साजरा करणार आहोत. हा संपूर्ण भारतासाठी आनंदाचा क्षण असून हा अशा प्रकारचे पहिला सोहळा असणार आहे. 5 ऑगस्टच्या सोगळ्यासाठी टाईम स्क्वेअरची 17 हजार स्क्वेअर फूटची LED स्क्रीन भाडे तत्तावर घेण्यात आली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत स्क्रीनवर भगवान राम आणि राम मंदिराची 3D प्रतिमा दाखवले जाणार असल्याची माहिती शेहानी यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे.

टाईम स्क्वेअर हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र असते. अनेक पर्यटक टाईम स्क्वेअरला आवर्जुन भेट देत असतात. त्यामुळे 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराचे 3D चित्रण येथे दाखवले जाईल. शिवाय पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करतानाचे फोटोही यावेळी दाखवले जाणार आहेत. भारतीय समाज 5 ऑगस्ट रोजी याठिकाणी जमा होऊन या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होईल, असंही शेहानी यांनी म्हटलं. 

चीन लडाखमध्ये मोठ्या संघर्षाची करतोय तयारी; सॅटेलाईट फोटोंमधून उघड
आयूष्यात एकदाच येणारा किंवा शतकातून एकदा पाहिला मिळणार असा हा सोहळा आहे. त्यामुळे आपल्याला हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करायला हवा. यासाठी प्रसिद्ध असे टाईम स्क्वेअर सारखे दुसरे ठिकाण कोणते असेल. जगभरातील हिंदूंनी पाहिलेले राम मंदिराचे स्वप्न पूर्ण होत आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हे शक्य होत आहे. हा क्षण इतक्या लवकर आमच्या जीवनात येईल असं वाटलं नव्हतं. मात्र, नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे शक्य होत आहे. त्यामुळे आम्हाला हा क्षण ऐतिहासिक पद्धतीने साजरा करायचा आहे, असंही शेहानी यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी अयोध्येत पहिली विट रचून राम मंदिराचे भूमिपूजन करत आहेत. या सोहळ्यासाठी अयोध्येत मोठी तयारी करण्यात येत आहे. अनेक मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. शिवाय हा सोहळा भारतीयांना घरबसल्या पाहता येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com