प्रेमाच्या वेडापायी तिने पाठवले लाखो मेसेज

वृत्तसंस्था
सोमवार, 7 जानेवारी 2019

न्यूयॉर्क: एकतर्फी प्रेम... महिलेने प्रेमापोटी त्याला प्रपोज केले. पण, त्याने ते प्रपोज नाकारले. तिला राहवेना... मग तिने आधार घेतला तो मेसेजचा. एकतर्फी प्रेमाच्या वेडापायी तिने त्याला पाठवले चक्क एक लाख 59 हजार मेसेज. त्या महिलेचे नाव जॅकलीन एडेस.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरिजोना येथे राहणारी जॅकलीन (वय 31) व एका पुरुषाची एका साइटवरून ओळख झाली होती. पुढे ती त्याच्या प्रेमात पडली. एकतर्फी प्रेम सुरू झाले. तिने त्याच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. परंतु, त्याने नकार दिल्यानंतर तिने त्याला गेल्या दहा महिन्यामध्ये एक लाख 59 हजार मेसेज पाठवले आहेत. यामध्ये काही धमक्यांचेही मेसेज आहेत.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जॅकलीनला मानसिक त्रासाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. जॅकलीन त्या व्यक्तीच्या घरी अनेकवेळा गेली आहे. तिने त्या व्यक्तीच्या घरातील सामानाचाही वापर केला आहे. मे 2018 मध्येही यामुळेच जॅकलीनला अटक केली होती. त्यावेळी तिच्या मोटारीमधून पोलिसांनी चाकू जप्त केला होता. 'इथं येण्यासाठी तू काहीही कर पण मला सोडण्याचा प्रयत्न करू नकोस, जर तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केल्यास मी तूला मारून टाकेल. असे एका मेसेजमध्ये तर दुसऱया मेसेजमध्ये तिने मी तुझ्या हाताची चॉपस्टिक तयार करेल, असे लिहले आहे.'

Web Title: love hurts Woman sent man 159K texts after online date

टॅग्स