जैसे ज्याचे कर्म तैसे...; प्रेयसीचा खून करून मृतदेह पुरताना प्रियकराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

जैसे ज्याचे कर्म तैसे...; प्रेयसीचा खून करून मृतदेह पुरताना प्रियकराचा मृत्यू

कॅरोलीना : म्हणतात ना आपल्या कर्माची फळं आपल्याला कधी ना कधी मिळत असतात. तसाच काहीसा प्रकार अमेरिकेतील साऊथ कॅरोलीनामध्ये घडला आहे. अमेरिकेत एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीचा खून केल्यावर त्याच्या अंगणात तिचा मृतदेह पुरत असतानाच त्याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

(Crime News)

दरम्यान दक्षिण कॅरोलिनाच्या एजफील्ड काउंटी पोलिसांना शनिवारी ट्रेंटन शहरात एका घराच्या अंगणात 60 वर्षीय जोसेफ मॅककिनन यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या मृत्यूचा तपास सुरू असताना, दुसरा मृतदेह नव्याने खोदलेल्या खड्ड्यात पुरलेला आढळून आला. पुरण्यात आलेला मृतदेह हा त्याच्या लिव्ह-इन पार्टनर पॅट्रिशिया डेंट (65) हिचा असल्याचं तपासातून समोर आलं आहे.

हेही वाचा: यमुना एक्सप्रेसवेवर अपघात, पुण्यातील पाचजण जागीच ठार, २ गंभीर

दरम्यान पोलिसांनी तपास केल्यावर सांगितलं की मॅककिननने डेंट हिच्यावर आधी हल्ला केली आणि त्यानंतर गळा दाबून खून केला होता. तीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यावर त्याने आपल्या घराच्या मागच्या बाजूस तिचा मृतदेह पुरण्यासाठी मोठा खड्डा खणला आणि त्यामध्ये तिचा मृतदेह पुरण्यासाठी तयारी केली होती. त्यानंतर त्याने डेंट या त्याच्या सोबत राहत असलेल्या महिलेचा मृतदेह त्याने एका प्लास्टिकच्या पिशवीत भरला आणि खड्ड्यात पुरत असताना त्याचा मृत्यू झाला. तपासात त्याच्या शरीरावार कोणत्याही प्रकारच्या जखमा आढळल्या नसून शवविच्छेदनात ह्रदयविकाराने त्याचा मृत्यू झाला असल्याचं स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान डेंटच्या बहिणीच्या फोन आणि मेसेज ला कोणताही प्रतिसाद न दिल्याने तीने त्याबद्दल माहिती पोलिसांना दिली होती. तिच्या सांगण्यावरून तपास केला असता पोलिसांना त्या दोघांचा मृतदेह आढळला होता.

Web Title: Lover Murder Death Body Second Death Heart Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :murderdeathglobal news
go to top