यमुना एक्सप्रेसवेवर अपघात, पुण्यातील पाचजण जागीच ठार, २ गंभीर

Accident
AccidentSakal

उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेसवेवर गुरुवारी पहाटे झालेल्या अपघातात चार महिलांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पहाटे 5 वाजता जेवार टोल प्लाझाच्या अलिकडे 40 किमीच्या परिघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच महामार्गावरील काहींनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. (Punekars Died on Yamuna Expressway) ट्रक आणि बोलेरो गाडीची भीषण धडक झाल्यानंतर ही दुर्घटना घडलीय.

तत्काळ पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेल्यानंतर यातील पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं. सध्या अन्य दोघांवर कैलास रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. (Yamuna ExpressWay Accident)

Accident
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गॅस टँकर उलटला, तिघांचा मृत्यू

सर्व दुर्घटनाग्रस्त व्यक्ती बारामतीच्या असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्यातील बहुतेक साठीच्या वयातील आहेत. वाहन चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चारचाकी ज्या ट्रकला धडकली तो पोलिसांनी जप्त केला आहे. (Yamuna Express way accident)

चंद्रकांत बुराडे (६८), स्वर्णा बुराडे (५९), मालन कुंभार (६८), रंजना पवार (६०) आणि नुवंजन मुजावर (५३, कर्नाटक) अशी मृतांची नावे असून अन्य दोन व्यक्ती अत्यवस्थ आहेत.

या अपघाताबाबत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मृतदेह रुग्णालयात पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात कुटुंबीयांकडे सोपवण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com