esakal | भारत, पाकिस्तानमध्ये उद्रेकाकडे डोळेझाक, कारण... 
sakal

बोलून बातमी शोधा

भारत, पाकिस्तानमध्ये उद्रेकाकडे डोळेझाक, कारण... 

भारतात केवळ ६६ हजार चाचण्या 
मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणे आत्ता पूर्वीपेक्षा सहज शक्य असले तरी भारतासारख्या देशात चाचणीसाठी विदेशी साहित्य उपलब्ध होण्यात अडथळे येत असताना स्थानिक पातळीवरील साहित्याचे प्रमाणही कमी आहे.

भारत, पाकिस्तानमध्ये उद्रेकाकडे डोळेझाक, कारण... 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसच्या चाचणीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने जगातील एक चतुर्थांश जगाकडे या घातक विषाणूंकडे दुर्लक्ष होण्याचा धोका आहे. या देशांमध्ये प्रामुख्याने भारत, इंडोनेशिया आणि पाकिस्तानचा समावेश आहे. या देशांमध्ये कोरोनाच्या तपासणीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष होण्याचा सर्वाधिक धोका तेथे आहे, असा निष्कर्ष ‘ब्ल्यूमबर्ग’ने काढला आहे. 

चाचण्यांचे प्रमाण वाढवा 
या संस्थेने आशियातील सहा देशांचा अभ्यास केला आहे. त्यांच्या अधिकृत अहवालात या धोक्याचा उल्लेख केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेत यावर बोलताना बोलताना ‘ब्ल्यूमबर्ग’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अधानोम घिब्रेयेसुस यांनी चाचणी न होणे म्हणजे संसर्गाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे, असे स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या प्रत्येक सकारात्मक निदानासाठी दहा चाचण्या असे प्रमाण वाढविण्याची विनंती त्यांनी या देशांना केली आहे. याचाच अर्थ असा की भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशियाने प्रत्येकी दहा लाखांमागे किमान १५ हजार चाचण्या करणे आवश्‍यक आहे. 

भारतात केवळ ६६ हजार चाचण्या 
मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणे आत्ता पूर्वीपेक्षा सहज शक्य असले तरी भारतासारख्या देशात चाचणीसाठी विदेशी साहित्य उपलब्ध होण्यात अडथळे येत असताना स्थानिक पातळीवरील साहित्याचे प्रमाणही कमी आहे. ३ एप्रिल रोजी भारतातील चाचण्यांची संख्या केवळ ६६ हजार होती. अमेरिकेच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. दक्षिण कोरियासारखे देश जे चाचण्यांमध्ये सर्वांत पुढे आहे, त्यांच्यापेक्षा भारत खूपच मागे आहे. बाधितांची जी अधिकृत आकडेवारी जाहीर होत आहे, ती पाहता भारतात या साथीच्या उद्रेकाकडे दुर्लक्ष होत असल्याची दाट शक्यता आहे, असे निरीक्षण ‘ब्ल्यूमबर्ग’ने नोंदविले आहे. 

इंडोनेशियात सर्वाधिक मृत्यूदर 
गंभीर परिस्थिती उद्भवण्यापूर्वी या देशांनी कोरोनाच्या संशयितांचा शोध घेऊन त्यांना एकांतवासात ठेवले नाही तर या देशांमधील आरोग्य व्यवस्था जी आधीच फारशी सक्षम नाही, ती आणखी धोक्यात येऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे. जर व्यापक प्रमाणात चाचण्या झाल्या तर ३ ते १२ टक्के रुग्ण ‘पॉझिटिव्‍ह’ आढळतील, असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. असे प्रमाण केवळ इंडोनेशियात दिसले आहे. तेथे आत्तापर्यंत जेवढ्या चाचण्या झाल्या आहेत, त्यातील २२ टक्के चाचण्या ‘पॉझिटिव्ह’ आल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण तेथे ८.९ टक्के आहे. उर्वरित देशांमध्ये ते तीन टक्क्यांनी कमी आहे. 

loading image
go to top