Devendra Fadnavis : चित्रनगरीच्या विकासासाठी सोनी कंपनीला निमंत्रण!

फडणवीस - जपानी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांमध्ये भेट
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal

टोकियो : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान भेटीच्या आजच्या शेवटच्या आणि पाचव्या दिवशी सोनी, डेलॉईट आणि सुमिटोमो या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. सोनी समूहाला चित्रनगरीत (फिल्मसिटी) येण्याचे तसेच आयआयटी मुंबईशी संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली.

तसेच बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सुमिटोमोला मुंबई ट्रान्सहार्बर लिंकमुळे तयार होणाऱ्या तिसऱ्या मुंबईत असलेल्या संधींची त्यांनी माहिती दिली. फडणवीस यांनी आज सोनी ग्रुप कॉर्पोरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिरो कॅम्बे यांची भेट घेतली.

तंत्रज्ञान आणि कंटेट क्षेत्रात महाराष्ट्राबरोबर काम करण्याची सोनीची इच्छा असल्‍याचे सांगत फडणवीस म्हणाले, की सोनी हा भारतातील विश्वसनीय ब्रँड आहे. फिल्मसिटीच्या विकासासाठी अनेक योजना असल्याचे सांगत ‘सोनी’ने फिल्मसिटीमध्ये तंत्रज्ञान साहाय्य द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

डेलॉईट तोहमत्सु समूहासमवेत भेट

‘डेलॉईट’ तोहमत्सु समूहाच्या ईको नागात्सु यांचीही आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. ग्रीन हायड्रोजन, कचऱ्यातून वीजनिर्मिती, लॉजिस्टिक, इलेक्ट्रिक व्हेईकल, हायस्पीड रेल्वे, स्टार्टअप आदी क्षेत्रांबाबत या वेळी चर्चा झाली.

महाराष्ट्रात जपानच्या मदतीने अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. ‘डेलॉईट’ ज्या पद्धतीने सेमिनार आयोजित करते, त्याप्रमाणे सेमिनार मुंबई आणि पुण्यातही व्हावेत, असे फडणवीस म्हणाले.

‘सुमिटोमो’चा पुढाकार

सुमिटोमो रिॲलिटी अँड डेव्हलपमेंट कंपनीचे अध्यक्ष कोजुन निशिमा यांचीही आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेतली. धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत राज्य सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती या वेळी फडणवीस यांनी दिली.

‘एमटीएचएल’मुळे मोठ्या प्रमाणात नवीन आवास क्षेत्र उपलब्ध होणार असून, तिसरी मुंबई ही पुढच्या काळात मोठी संधी असेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. निशिमा यांनी यावर्षी अखेरपर्यंत आपण मुंबईत निश्चितपणे भेट देऊ, असे सांगितले. मेट्रो स्थानकानजीक उंच इमारती बांधण्यासाठी ‘सुमिटोमो’ने उत्सुकता दर्शविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com