esakal | महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब
sakal

बोलून बातमी शोधा

mahatma gandhi

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात एका पार्कमध्ये असलेल्या महात्मा गांधींच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली आहे

महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात एका पार्कमध्ये असलेल्या महात्मा गांधींच्या प्रतिमेची तोडफोड करण्यात आली आहे. काही अज्ञात माथेफिरुंनी हे कृत्य केले असल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेमुळे स्थानिक भारतीयांमध्ये प्रचंड संताप असून प्रकरणाचा तपास हेट क्राईमसारखा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीला असा प्रकार समोर आल्याने गालबोट लागले आहे. 

6 फूट उंच आणि जवळपास 294 किलो वजनी कास्य मूर्ती नॉर्दर्न कॅलिफोनिर्याच्या डेविस शहरच्या सेंट्रल पार्कमध्ये लावण्यात आली होती. स्थानिक वृत्तपत्र डेविस एंटरप्राईजने दिलेल्या माहितीनुसार, महात्मा गांधींच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली असून चेहऱ्याचा भाग गायब आहे. 

'शेतकऱ्यांचा अपमान सहन होत नाही'; अनेक भाजप नेते राजीनाम्याच्या...

पोलिसांनी सांगितल्यानुसार, महात्मा गांधींची तोडफोड झालेली प्रतिमा एका कर्मचाऱ्याला 27 जानेवारीच्या सकाळी मिळाली होती. डेविल सिटीचे काऊंसिलमॅन लुकस फ्रेरिक्स यांनी सांगितलं की महात्मा गांधी यांची प्रतिमा सुरक्षित ठिकाणी हटवण्यात आली असून याप्रकरणी तपास केला जात आहे. 

महात्मा गांधी यांची प्रतिमा नेमकी केव्हा आणि कोणत्या कारणासाठी तोडण्यात आली याबाबतचं कारण समजू शकलेलं नाही. डेविस पोलिसांनी सांगितलं की ते याप्रकरणाला गंभीरतेने घेत आहेत. महात्मा गांधींची ही प्रतिमा भारत सरकारकडून डेविस शहराला देण्यात आली होती. ही प्रतिमा चार वर्षांपूर्वी लावण्यात आली होती. दरम्यान, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.  

loading image