Global: ‘एस-४००’ हे क्षेपणास्त्र देण्याची प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एस-४००’ क्षेपणास्त्र

‘एस-४००’ हे क्षेपणास्त्र देण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : रशियाने ‘एस-४००’ ही क्षेपणास्त्र यंत्रणा भारताला देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पृष्ठभागावरून हवेत मारा करण्याची या क्षेपणास्त्रांची क्षमता आहे. रशियाच्या फेडरल सर्व्हिस फॉर मिलिटरी टेक्निकल कोऑपरेशन विभागाचे संचालक दिमित्री शुगेव यांनी याबाबतची माहिती दिली आहे. भारताने ऑक्टोबर २०१८मध्ये रशियाबरोबर ‘एस-४००’ क्षेपणास्त्र यंत्रणा घेण्यासाठी पाच अब्ज अमेरिकी डॉलरचा करार केला होता. हा करार झाला तर भारतावर निर्बंध लावण्याचा इशारा तत्कालीन ट्रम्प प्रशासनाने दिला होता. त्यानंतरही हा करार करण्यात आला. या करारापोटी भारताने पहिल्या हप्त्यात ८० कोटी डॉलर २०१९मध्ये रशियाला दिले. ‘एस-४००’ ही रशियाची अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे पुढील महिन्यात भारतात येणार आहेत. त्याच्या दौऱ्यापूर्वीच क्षेपणास्त्र यंत्रणा देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती रशियाने दिली. भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी मात्र या बाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. या वर्ष अखेरीस पहिली यंत्रणा भारतात कार्यान्वित झाली असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Video: बोल्टची 'स्मार्ट' गोलंदाजी... वॉर्नरचा उडवला त्रिफळा!

‘एस-४००’ क्षेपणास्त्र यंत्रणा अगोदरच चीन आणि तुर्कस्तानात वापरली जात आहे. पश्‍चिम आशिया, आशिया प्रशांत क्षेत्र आणि आफ्रिकेतील सात देशांबरोबर ‘एस-४००’च्या विक्रीबाबत चर्चा सुरू आहे, अशी माहिती रशियाच्या शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या ‘सोरोबोरोनएक्सपोर्ट’ कंपनीचे प्रमुख अलेक्झांडर मिखेव्ह यांनी दिली आहे.

पाकिस्तान सीमेवर तैनात शक्य

भारताच्या पश्चिम सीमेवर ए-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा तैनात करण्यात येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याद्वारे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही सीमावरील हालचालींना आळा घालता येऊ शकणार आहे. चीनने ए-४०० क्षेपणास्त्रांच्या दोन स्क्वाड्रन तिबेटमधील एनगारी गर गुन्सा आणि यिंगची हवाईतळ येथे तैनात केल्या आहेत.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

अशी आहे यंत्रणा

एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणेद्वारे ४०० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे विमान अथवा एखादे क्षेपणास्त्र पाडता येणे शक्य होणार आहे. या यंत्रणेमध्ये चार वेगवेगळी क्षेपणास्त्रे आहेत. त्याद्वारे शत्रूची विमाने, बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि एडब्लूएसीएस यंत्रणा असलेली विमाने पाडता येऊ शकतील. याचा सर्वांत कमी पल्ला ४० किलोमीटर असून सर्वाधिक पल्ला ४०० किलोमीटर एवढा आहे.

वार्षिक शिखर परिषद

रशिया आणि भारत यांच्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वार्षिक शिखर परिषद होण्याची शक्यता आहे. त्यावेळी आणि काही करारांवरही स्वाक्षऱ्या होणे अपेक्षित आहे. या परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या वर्षातील पुतीन यांची हा दुसरा परदेश दौरा असेल

loading image
go to top