
Mahatma Gandhi Statue Vandalized in London Two Days Before Gandhi Jayanti
Esakal
Mahatma Gandhi Statue Vandalized: लंडनच्या टॅविस्टॉक स्क्वायर इथं असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना घडलीय. या प्रकरणी भारतीय उच्चायुक्तालयाने कठोर शब्दात निषेध व्यक्त केलाय. गांधी जयंती अवघ्या दोन दिवसांवर आली असताना घढलेल्या या घटनेमुळे खळबळ उडालीय. पुतळ्याच्या चबुतऱ्यावर काही आक्षेपार्ह शब्दही लिहिण्यात आले आहेत. भारतीय उच्चायुक्तांनी सांगितलं की, स्थानिक अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आलीय. पुतळ्याची तोडफोडही केली असून पुतळा व्यवस्थित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.