

Sri Lanka politics mahinda rajapaksa admitted to hospital AS09
esakal
Colombo : श्रीलंकेच्या राजकारणात एकेकाळी वर्चस्व गाजवणाऱ्या राजपक्षे कुटुंबाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. 'वासे फिरले की घरही फिरते' असा अनुभव सध्या राजपक्षे कुटुंबीय घेत आहेत. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना सोमवारी (१२ ऑक्टोबर) प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे, त्यांच्या पत्नी शिरांथी राजपक्षे यांना कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटक झाली असून, मुलगा आणि खासदार नमल राजपक्षे हाही दुसऱ्या एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.