धड धरताही येईना अन् सोडताही येईना; कुत्र्यामुळे जो बायडन यांची पंचाईत

Biden With Dog
Biden With Dog

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या जवळपास प्रत्येक राष्ट्राध्यक्षाने व्हाईट हाऊसमध्ये कोणता ना कोणता एकतरी पाळीव प्राणी पाळलाच आहे. यामध्ये घोडे, गाय, मेंढ्या, कुत्रा, मांजर यांचा समावेश आहे. जॉर्ज बुश यांनी पाळलेल्या मांजराचं नाव 'इंडिया' असल्याने त्यावरुन वाददेखील झाला होता. आता अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष असलेले जो बायडन यांना देखील कुत्रे पाळण्याची खूपच आवड आहे. मात्र, त्यांची ही हौस आता दुसऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. बायडन यांच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्याचा चावा घेतला आहे. हा अधिकारी नॅशनल पार्क सर्व्हीसचा कर्मचारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सोमवारी दुपारी व्हाईट हाऊसच्या साऊथ लॉनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला बायडन यांचा कुत्रा 'मेजर' याने चावलं आहे. मेजर कुत्र्याच्या या हल्ल्यात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याला लागलीच व्हाईट हाऊसच्या मेडीकल युनिटने उपचार दिले. याबाबत अमेरिकेच्या प्रथम महिला जिल बायडन यांच्या प्रेस सचिव मिशेल ला रोसा यांनी CNN ला माहिती देताना म्हटलंय की, मेजर अगदी अलिकडेच व्हाईट हाऊसमध्ये आला आहे आणि तो अजून इथल्या वातावरणात रुळला नाहीये. मेजरने वॉकदरम्यान एका कर्मचाऱ्याचा चावा घेतला आहे. या जखमी कर्मचाऱ्यावर तात्काळ इलाज केला गेला आहे आणि आता तो कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाला आहे. 

अमेरिकेत नुकतेच राष्ट्राध्यक्षपदी आलेल्या जो बायडन यांना पूर्वीपासूनच कुत्रे पाळण्याची आवड आहे. त्यांनी आपली ही हौस आजतागायत जपली आहे. आजही राष्ट्राध्यक्ष झाल्यावर देखील त्यांनी आपला हा छंद जपला आहे. मेजर अवघ्या तीन वर्षांचा 2018 मध्ये असताना बायडन यांनी मेजरला दत्तक घेतलं होतं. मात्र, मेजरने केलेल्या या कारनाम्याबाबत नॅशनल पार्क सर्व्हिसने सध्यातरी काहीही वक्तव्य केलं नाहीये. गेल्या दोन आठवड्यांमध्ये मेजरला ट्रेनिंग देखील दिली गेली आहे. याआधी या महिन्यातच मेजरने आणखी एका व्यक्तीचा चावा घेतला होता. सोमवारी संध्याकाळी या मेजरला साउथ लॉनमध्ये व्हाईट हाऊसचा एक कर्मचारी फिरवण्यास घेऊन गेला होता, तेंव्हाच मेजरने त्या कर्मचाऱ्याचा चावा घेतला. CNN ने दिलेल्या माहितीनुसार 8 मार्चला मेजरमुळे व्हाईट हाऊसमध्ये तैनात असलेल्या सीक्रेट सर्व्हिसचा एक कर्मचारी जखमी झाला होता आणि त्याच्यावर मेडीकल टीमने उपचार केला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com