"ट्रम्प, मिया खलिफाला राजदूत करा..!'

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

विभिन्न सांस्कृतिक पार्श्‍वभूमी असलेल्या नागरिकांनाही आंतरराष्ट्रीय समुदाय व आपल्या देशाच्या हितासाठी एकत्र आणण्यात मियाने मोठीच कामगिरी बजाविली आहे. अमेरिकेचे मध्यपूर्वेत प्रतिनिधीत्व करण्याचे महत्त्वपूर्ण काम ती नक्‍कीच यशस्वीपणे पार पाडू शकेल. याचबरोबर, अमेरिकेमधील "मेल्टिंग पॉट' संस्कृतीचेही ती उत्तम प्रतीक आहे...

वॉशिंग्टन - जगप्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलिफाला सौदी अरेबियामधील अमेरिकन राजदूत म्हणून नियुक्त करावे, अशी मागणी अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे एका ऑनलाईन याचिकेद्वारे करण्यात आली आहे! या याचिकेवर याआधीच 1200 जणांनी स्वाक्षरी केली आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या याचिकेस किमान 1500 नागरिकांचा पाठिंबा मिळविण्याचे उद्दिष्ट याचिकाकर्त्यांनी बाळगले आहे.

"विभिन्न सांस्कृतिक पार्श्‍वभूमी असलेल्या नागरिकांनाही आंतरराष्ट्रीय समुदाय व आपल्या देशाच्या हितासाठी एकत्र आणण्यात मियाने मोठीच कामगिरी बजाविली आहे. अमेरिकेचे मध्यपूर्वेत प्रतिनिधीत्व करण्याचे महत्त्वपूर्ण काम ती नक्‍कीच यशस्वीपणे पार पाडू शकेल. याचबरोबर, अमेरिकेमधील "मेल्टिंग पॉट' संस्कृतीचेही ती उत्तम प्रतीक आहे,'' असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी याआधी साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर निक्‍की हॅले यांना संयुक्‍त राष्ट्रसंघामधील अमेरिकेच्या राजदूत म्हणून नियुक्‍त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्या या याचिकेसंदर्भातील भूमिकेविषयी उत्सुकता व्यक्त करण्यात आली आहे.

Web Title: 'Make porn star Mia Khalifa US ambassador to Saudi Arabia'