esakal | उप-राष्ट्रपती पदाची उमेदवारी महिलेला मिळाल्याने पुरुषांचा अपमान- डोनाल्ड ट्रम्प 
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump and kamla harris1.jpg

अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (US Presidential Elections 2020) जवळ येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण तापलं आहे

उप-राष्ट्रपती पदाची उमेदवारी महिलेला मिळाल्याने पुरुषांचा अपमान- डोनाल्ड ट्रम्प 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका (US Presidential Elections 2020) जवळ येऊन ठेपल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) यांनी मंगळवारी उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी त्यांच्या निवडीवर टीका केली आहे. तसेच ट्रम्प यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. उपराष्ट्रपतीपदाची उमेदवार म्हणून एका महिलेची निवड झाल्याने पुरुष अपमानित वाटून घेऊ शकतात, असं ते म्हणाले आहेत. 

मोठी बातमी : भारतीयांचा यूके, अमेरिका, कॅनडा आणि युएईला प्रवास शक्य

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स स्पोर्टसला दिलेल्या रेडिओ मुलाखतीमध्ये वरील वक्तव्य केलं आहे. बायडेन यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी कमला हॅरिस यांची निवड केली. यामुळे डेमोक्रॅटिक पक्षातील काही पुरुष प्रतिस्पर्धी उमेदवारांना अपमान झाल्यासारखं वाटू शकतं. काही म्हणतील पुरुषांचा अपमान झाला आहे आणि काहींना वाटेल हे ठिक आहे, असं ट्रम्प म्हणाले आहेत. 

जो बायडेन यांनी प्रचाराची सुरुवात करतानाच आपल्या सरकारमध्ये विविधता असेल असं म्हटलं होतं. तसेच मार्च महिन्यांत त्यांनी घोषीत केलं होतं की, उपराष्ट्रपतीपदासाठी ते महिला उमेदवाराची निवड करतील. त्यामुळे कॅलिफोर्नियाच्या सिनेटर कमला हॅरिस यांनाच या पदासाठी संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मागील आठवड्यात बायडेन यांनी कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली. 

आनंदाची बातमी; भारताच्या कोरोना लसीचा पहिला टप्पा यशस्वी; कोणतेही दुष्परिणाम...

सिनेटमध्ये निवड झालेल्या कमला हॅरिस पहिल्या कृष्णवर्णीय आणि आशियाई महिला ठरल्या आहेत. त्यांच्या आई भारताली चेन्नईच्या असून त्यांचे वडील जमेकाचे रहिवाशी आहेत. अमेरिकेत आतापर्यंत केवळ दोन वेळा उपराष्ट्रपतीपदासाठी महिलांना नामांकण मिळाले आहे. सारा पॉलिन यांना 2008 साली रिपब्लिकन पक्षाने आणि 1984 मध्ये डेमोक्रेट्सने गेराल्डिन फेरारो यांना उमेदवारी दिली होती. अमेरिकेत आतापर्यंत एकदाही महिला राष्ट्रपती झाली नाही. 

कमला हॅरिस यांच्या निवडीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी टीका केली होती.  कमला हॅरिस यांची कामगिरी प्रभावहिन आणि वाईट राहिलेली आहे, त्यामुळे त्यांच्या निवडीमुळे मी आश्चर्यचकित झालो आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या ब्रेट कवानाच्या 2018 मधील सिनेट कन्फर्मेशदरम्यान हॅरिस यांची कामगिरी अमेरिकी सिनेटमधील सर्वात निकृष्ट, सर्वात भीतीदायक आणि कोणाचाही सन्मान न करणारी होती, असं ते म्हणाले होते.