मोबाईल चार्जिंगला असताना स्फोट ; मलेशियन सीईओचा मृत्यू

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जून 2018

'क्रॅडल फंड' ही कंपनी मलेशियन अर्थमंत्रालयाशी निगडित आहे. हसन त्या कंपनीचे सीईओ होते. हसन हे ब्लॅकबेरी आणि हुवावे या दोन मोठ्या कंपनीचे स्मार्टफोन वापरत होते. हे दोन्ही फोन हसन यांनी त्यांच्या बेडरूममध्ये चार्जिंगसाठी लावले होते. मात्र, काही तासानंतर या मोबाईलाचा स्फोट झाल्याचे समोर आले.

नवी दिल्ली : मोबाईल चार्जिंगला असताना स्फोट होऊन आत्तापर्यंत अनेक जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता मोबाईल चार्जिंगला असताना मोबाईल फोनचा स्फोट होऊन 'क्रॅडल फंड' कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नझरीन हसन यांचा मृत्यू झाला. 

'क्रॅडल फंड' ही कंपनी मलेशियन अर्थमंत्रालयाशी निगडित आहे. हसन त्या कंपनीचे सीईओ होते. हसन हे ब्लॅकबेरी आणि हुवावे या दोन मोठ्या कंपनीचे स्मार्टफोन वापरत होते. हे दोन्ही फोन हसन यांनी त्यांच्या बेडरूममध्ये चार्जिंगसाठी लावले होते. मात्र, काही तासानंतर या मोबाईलाचा स्फोट झाल्याचे समोर आले. तसेच बेडरूममधील चटई जळून भस्मसात झाली. ही घटना कशामुळे झाली याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. मात्र, हे दोन्ही फोन अत्यंत गरम झाल्याने त्यांचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 

हसन यांच्या मेहूण्याने याबाबत सांगितले, की हसन यांचा मृत्यू मोबाईल फोनच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीमुळे झाला नाही. जेव्हा या स्मार्टफोनचा स्फोट झाला तेव्हा मोबाईल फोनचा तुटलेला भाग त्यांच्या डोक्याला लागला आणि त्यामुळे त्यांना 'ब्लंट ट्रॉमा' झाला. मात्र, आम्हाला माहिती नाही की कोणत्या मोबाईलचा स्फोट झाला.

Web Title: Malaysian CEO dies after smartphone explodes while charging