जगात सर्वांत आधी पर्यटन खुलं करत अर्थव्यवस्थेला उभारी देतोय मालदीव; पर्यटकांना लसही देणार

जगात सर्वांत आधी पर्यटन खुलं करत अर्थव्यवस्थेला उभारी देतोय मालदीव; पर्यटकांना लसही देणार

मालदीव : सध्या संपूर्ण जगात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार माजवला आहे. गेल्या दिड वर्षांपासून संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या या विषाणूने आजतागायत माणसाची पाठ सोडलेली नाहीये. डोळ्यांनाही न दिसणाऱ्या या लहानशा विषाणूने सारं जगच घरबंद करुन टाकलं होतं. आता परिस्थिती थोडी बरी असली तरीही जग अजूनही संपूर्णपणे या संकटातून सावरलेलं दिसत नाहीये. कोरोनाने संपूर्ण जगाचीच अर्थव्यवस्था कोडमडलेली पहायला मिळाली. अशात छोट्या छोट्या देशांना फारच नुकसान सहन करावं लागलं. मालदीव हा देश अशाच छोट्या देशांपैकी एक ज्याची संपूर्ण अर्थव्यवस्था उभी आहे ती म्हणजे निव्वळ पर्यटनावर!

कोरोना व्हायरसशी लढा सुरु असताना आता मालदीव हा जगातला असा पहिला देश बनला आहे, ज्याने पर्यटकांसाठी आपल्या देशाचे दरवाजे खुले केले आहेत. आणि आता रखडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी मालदीव विविध उपाययोजना अंमलात आणत आहे. पर्यटनावर आधारित आपल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मालदीवने आता 'वॅक्सीन टुरिझम'ला प्रमोट करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार, मालदीव आता तिथे येणाऱ्या पर्यटकांना लस देणार आहे, जेणेकरुन त्याठिकाणी मोठ्या संख्येने लोक पर्यटनाला येऊ शकतील.

जगात सर्वांत आधी पर्यटन खुलं करत अर्थव्यवस्थेला उभारी देतोय मालदीव; पर्यटकांना लसही देणार
अनुष्काचा वेडिंग लूक अभिनेत्रींकडून कॉपी, पाहा पेस्टल पिंक रंगाचे डिझायनर लेहंगा

मालदीवचे पर्यटन मंत्री डॉ. अब्दुल्ला मौसूम यांनी म्हटलंय की, मालदीव आता '3 V टुरिझम' स्कीम तयार करत आहे. याअंतर्गत पर्यटकांना 'व्हीजीट, व्हॅक्सीनेट आणि व्हॅकेशन' अर्थात 'या आणि लस घेऊन पर्यटनाचा आनंद घ्या' अशी सुविधा प्राप्त होणार आहे. मौसूम यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात फिरायला आलेल्या पर्यटकांना लशीचे दोन डोस दिले जातील. याचा अर्थ या स्कीम अंतर्गत इथे येणाऱ्या पर्यटकांना मालदीवमध्ये काही आठवडे रहावं लागेल. त्यांना अशी आशा आहे की, त्यामुळे मालदीवमधील पर्यटनाला पुन्हा एकदा उभारी मिळेल. मालदीवमध्ये दरवर्षी साधारण 17 लाख लोक पर्यटनासाठी येतात.

मात्र, सध्या तरी मालदीवच्या 'व्हॅक्सीनेशन पॅकेज'ला घेण्यासाठी इच्छुक पर्यटकांना काही वेळ वाट पहावी लागणार आहे. '3 V' स्कीमची सुरवात तोपर्यंत होणार नाहीये जोवर मालदीवच्या 5.5 लाख लोकसंख्येला लस दिली जात नाही. मालदीवच्या 53 टक्के लोकसंख्येला लशीचा पहिला डोस दिला गेला आहे. ज्यामध्ये 90 टक्के फ्रंटलाईन वर्कर्स आहेत. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या माहितीनुसार, मालदीवच्या जीडीपीमध्ये टुरिझमचे योगदान तब्बल 28 टक्के आहे. हे जगात सर्वांत जास्त आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com