
Male Bra: इथले पुरूष का घालत आहेत ब्रा, पॅन्टी? डोक्यावर पडले नाहीत तर...
चीन सरकार जिनपिंग सरकार नेहमीच चर्चेत असते. कधी पाकिस्तानशी मैत्री, कधी कोरोना व्हायरस, कधी सीमा वाद चर्चेत राहिला आहे, मात्र अलीकडे जिनपिंग सरकारच्या एका निर्णयामुळे चीन पुन्हा चर्चेत आला आहे. चीनमध्ये आता मुले सोशल मीडियावर मुलींच्या अंडरगारमेंटचे घातलेल्या अवस्थेत व्हिडिओ शेअर करत आहेत.
पुरूषांना महिलांचे आकर्षण असणे हि सामान्य बाब आहे. पण, पुरूषांना महिलांच्या अंडरवेअर्सचेही आकर्षण असते का? असा प्रश्न आज पडला आहे. कारण, चीनमधील पुरूष डोक्यावर परिणाम झाल्यासारखे महिलांच्या ब्रा पॅन्टी घालत आहेत. एवढेच नाही तर हे पुरूष त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओही सोशल मिडियावर शेअर करत आहेत.
काय आहे नक्की विषय?
त्याच झालं असं की, चीन सरकार डोक्यावर पडल्यासारखं काहीही विचित्र निर्णय देत असतात. त्याप्रमाणेच त्यांनी आता महिलांनी अंतरवस्त्रे घालून सोशल मिडियावर येऊ नये. तशी कोणतीही जाहीरात करू नये अथवा पर्सनल फोटो शेअर करू नयेत, असा फतवा काढला आहे.
चीन सरकारच्या नवीन नियमानुसार, अंडरगारमेंट परिधान करणाऱ्या महिलांना ऑनलाइन प्रचार करणे म्हणजे अश्लीलता पसरवण्यासारखे आहे. त्यामुळेच आता चीनमधील मुले महिलांचे अंडरवियर परिधान करून प्रचार करत आहेत.

पुरूषांनी महिलांच्या पॅन्टी,ब्राची जाहीरात केली
सरकारच्या या आदेशानंतर आता पुरुष चीनच्या अंतर्वस्त्र उद्योगाला चालना देण्यासाठी पुढे येत आहेत. यामुळे हे पुरुष लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप्सवर अंडरगारमेंट घालून महिलांना प्रोत्साहन देत आहेत.
Statista च्या मते, चीनचे लाइव्हस्ट्रीम शॉपिंग शो एक भरभराटीचा उद्योग आहे. जो या वर्षात $700 अब्ज पेक्षा जास्त असेल असा अंदाज आहे. मॅकिन्सेच्या मते, हा उद्योग देशाच्या ई-कॉमर्स उत्पन्नापैकी 10 टक्के वाटा मानला जातो. मात्र, चीन सरकारच्या बंदीच्या निर्णयानंतरही व्यावसायिकांनी ही युक्ती शोधून काढली आहे.
याचाच फायदा घेत आता काही व्यावसायिक महिलांचे इनरवेअर ऑनलाइन दाखवण्यासाठी पुरुष मॉडेल्सची भरती करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रा-बंटीमध्ये पहिल्यांदाच पुरुष मॉडेल प्रसारित करण्यात आले होते.