Mali Terrorism : मालीमध्ये ५ भारतीयांचे दहशतवाद्यांकडून बंदुकीच्या धाकावर अपहरण; अल-कायदा अन् ISIS ची दहशत वाढली

Al Qaeda Mali : अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मालीमध्ये २०१२ पासून दहशतवाद आणि अस्थिरता सतत वाढत आहे. परदेशी कर्मचाऱ्यांचे अपहरण करून खंडणी मागणे हा दहशतवादी गटांचा प्रमुख उद्देश आहे.
Armed militants in Mali’s conflict zone where five Indian workers were reportedly kidnapped near Kaoubé; Al-Qaeda and ISIS-linked groups suspected.

Armed militants in Mali’s conflict zone where five Indian workers were reportedly kidnapped near Kaoubé; Al-Qaeda and ISIS-linked groups suspected.

esakal

Updated on

Summary

  1. मालीमध्ये पाच भारतीय कामगारांचे अल-कायदा आणि आयसिसशी संबंधित दहशतवाद्यांकडून अपहरण झाले.

  2. हे भारतीय कौबीजवळील एका विद्युतीकरण कंपनीत काम करत होते.

  3. अपहरणानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी राजधानी बामाको येथे हलवण्यात आले.

अफ्रिकेतील माली देशात दहशतवाद्यांनी पाच भारतीयांचे गुरुवारी अपहरण केले. या देशात जिहादी दहशतवाद शिगेला पोहोचला आहे. अल-कायदा आणि आयसिस सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित गटांनी खूप मोठी दहशत निर्माण केली आहे. मालीयन सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार, सशस्त्र दहशतवाद्यांनी कौबीजवळ किमान पाच भारतीयांचे अपहरण केले. ते एका विद्युतीकरण कंपनीत काम करत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com