esakal | धक्कादायक! एक्स बॉसने FB रिक्वेस्ट स्वीकारली नाही, तरुणाने घरावर केला हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

fb

फेसबुकवर माजी बॉसला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. पण ती रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून दोन दिवसांनी बॉसला मारण्याची धमकी दिली. 

धक्कादायक! एक्स बॉसने FB रिक्वेस्ट स्वीकारली नाही, तरुणाने घरावर केला हल्ला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सोशल मीडियावर झालेल्या वादातून रिअल लाइफमध्ये  भांडण होण्याच्या घटना घडल्याचं यापूर्वी समोर आलं आहे. अनेकदा व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये अॅड केल्याबद्दल, स्टेटसवरून वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आता अमेरिकेत एका व्यक्तीने त्याच्या बॉसला वारंवार धमक्या दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. 29 वर्षीय सालेब बुर्जकने फेसबुकवर माजी बॉसला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. पण ती रिक्वेस्ट स्वीकारली नाही म्हणून दोन दिवसांनी बॉसला मारण्याची धमकी दिली.

अमेरिकेतील नॉर्थ डकोटा इथं राहणाऱ्या सालेबनं फेसबुकवर लिहिलं की, तो वायर एनर्जी सर्व्हिसमध्ये वायरलाइन ऑपरेटर म्हणून काम करतो. तो बॉसचा इतका तिरस्कार करतो की आधीचा बॉस केली डंकनला जॉब प्रोफाइलवरून शिव्याही दिल्या. सालेबने 24 डिसेंबरला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. 

हे वाचा - पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला भर रस्त्यात दिला चोप

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर दोन दिवसांनी या व्यक्तीने आपल्या एक्स बॉसला धमकी देत म्हटलं की, जर तुम्ही माझी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाहीत तर तुम्हाला मारून टाकेल. या धमकीच्या काही दिवसांनी त्याने पुन्हा एक मेसेज केला की जर मला पिकअप ट्रक वापरायचा आहे आणि तुम्हाला ट्रॅक करायचं आहे. तुमच्यासाठी हे चांगलं नसेल. यामध्ये ट्रकचा एक फोटो पाठवला होता. 

दरम्यान, प्रशासनाने दावा केला की, या व्यक्तीने इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपल्या एक्स बॉसला धमक्या दिल्या होत्या. त्याने असंही लिहिलं होतं की, तो आपल्या एक्स बॉसच्या घरावर हल्ला करणार आहे आणि त्यांना नव्या दरवाजाची गरज पडेल. 

हे वाचा - देशातील पक्ष्यांच्या मृत्यूने `हायअलर्ट'; वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याची सूचना

सालेबच्या एक्स बॉसच्या घरात सीसीटीव्ही असून त्याच्या फूटेजमध्ये सालेब दरवाजावर लाथ मारताना दिसला आहे. तसंच स्नॅपचॅटवर शेअर केलेल्या फोटोत घातलेल्या कपड्यांमध्येच तो होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी जामीन मिळण्यासाठी सालेबला 25 हजार डॉलर भरावे लागणार आहेत.