South Africa : खुनाचा पुरावा मिटवण्यासाठी तळघरात जाळला मृतदेह अन् संपूर्ण इमारतीलाच लागली आग! 77 जणांचा नाहक बळी

पोलिसांनी या व्यक्तीचं नाव जाहीर केलेलं नाही. आफ्रिकेतील स्थानिक माध्यमं त्याचा उल्लेख 'मि. एक्स' असा करत आहेत.
South Africa Johannesburg fire
South Africa Johannesburg fireeSakal

South Africa Johannesburg fire : दक्षिण आफ्रिकेमध्ये एका इमारतीला आग लागून तब्बल 77 जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आता एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने आपण केलेल्या खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी एक मृतदेह जाळला होता, मात्र यामुळे संपूर्ण इमारतीलाच आग लागली होती.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जोहान्सबर्ग येथे ही भीषण दुर्घटना घडली होती. विशेष म्हणजे, या घटनेनंतर सुरू असलेल्या सामान्य चौकशीत पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली आहे. ही व्यक्ती देखील याच इमारतीमधील रहिवासी होती. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यालाही विचारपूस करण्यात येत होती. यामध्येच त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली, आणि पोलिसांनाही धक्का बसला. (South Africa Fire News)

मि. एक्स

पोलिसांनी या व्यक्तीचं नाव जाहीर केलेलं नाही. आफ्रिकेतील स्थानिक माध्यमं त्याचा उल्लेख 'मि. एक्स' असा करत आहेत. मि. एक्सने सांगितलं, की तो अंमली पदार्थांच्या आहारी गेला होता. एका टांझानियन ड्रग डीलरने त्याला एका व्यक्तीची हत्या करण्यास सांगितली होती. यानुसार मिस्टर एक्सने त्या व्यक्तीला इमारतीच्या तळघरात नेलं, त्याठिकाणी मारहाण करुन, गळा आवळून तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून त्या मृतदेहावर गॅसोलीन (ज्वलनशील पदार्थ) टाकून त्याने तो पेटवून दिला होता.

South Africa Johannesburg fire
Gold Mine Collapse : सोन्याची खाण ठरली जीवघेणी! मालीत भीषण अपघातात 70हून अधिक लोकांचा मृत्यू

मि. एक्सवर खुनाचा प्रयत्न आणि मारहाण असे तब्बल 120 गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याला लवकरच न्यायालयासमोर उभं केलं जाईल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

इमारतीमध्ये होते कित्येक गुन्हेगार

या इमारतीमध्ये कित्येक गुन्हेगार राहत होते. संपूर्ण इमारतीवरच त्यांनी बेकायदेशीर ताबा मिळवला होता, असंही मि. एक्सने पोलिसांना सांगितलं. या इमारतीचं तळघर म्हणजे कत्तलखानाच होता. आग लागण्याच्या आधीपासूनच त्याठिकाणी कित्येक मृतदेह पडले होते, असंही त्याने आपल्या जबाबात सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com