
पाकिस्तानमध्ये गोड गोड बोलून पुरुषांना फसवत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील अश्लिल फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये गोड गोड बोलून पुरुषांना फसवत असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील अश्लिल फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एफआयएकडून मिळालेल्या आकड्यांनुसार गेल्या वर्षी आणि या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांत पाकिस्तानात तीन प्रमुख शहर कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये एकूण ९५ सायबर क्राईमची प्रकरणं दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये ७० टक्के म्हणजे ६७ प्रकरणे महिलांद्वारा ब्लॅकमेल करण्यासंबंधित आहे. यामध्ये गुन्हा नोंदवणारीही महिलाच आहेत.
जगाची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनामुक्त झालेल्या वुहानमध्ये पुन्हा सापडला रुग्ण
एफआयएनुसार शिक्षित महिला स्वत:चे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ बनवतात आणि ब्लॅकमेल करतात. या प्रकणात शिक्षित पुरुषांचा सहभाग आहे. महिला ज्यांना ब्लॅकमेल करीत आहेत, त्यामध्ये त्याचं पती, पूर्व पती, मंगेतर, मित्र यांचा सहभाग आहे. महिला गोड गोड बोलून पुरुषांना फसवत असल्याची ही बाब यातून समोर आली आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग रुग्णालयात दाखल
आतापर्यंत अधिकांश संख्येने पुरुष ब्लॅकमेलिंग करीत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, पाकिस्तानात महिला ब्लॅकमेलिंग करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. आकड्यांनुसार कराचीत एकूण ३९ प्रकरणं दाखल करण्यात आली असून ज्यामध्ये ३१ महिलांना ब्लॅकमेल करण्यासंदर्भातील आहेत. तर ८ मध्ये बँकेत फसवणूक, हॅकिंग, आयडीची चोरी आणि नागरिकांची लूट आदी गुन्ह्यांचा सहभाग आहे. हमारी वेब डॉट कॉममधील बातमीनुसार सांगितले गेले आहे की, लाहोरंमध्ये यातील ३६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ब्लॅकमेल करण्यासाठी २६ गुन्हा दाखल केले आहेत.