स्वतःच्या मुलीसह २० अल्पवयीन मुलींशी लग्न केलं; कथित धर्मगुरुच्या दाव्याने खळबळ International News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

American man claims that he had 20 wives
स्वतःच्या मुलीसह २० अल्पवयीन मुलींशी लग्न केलं; कथित धर्मगुरुच्या दाव्याने खळबळ

स्वतःच्या मुलीसह २० अल्पवयीन मुलींशी लग्न केलं; कथित धर्मगुरुच्या दाव्याने खळबळ

अमेरिकेतल्या एका माणसाच्या दाव्यामुळे सध्या जगभरात खळबळ उडाली आहे. आपण स्वतःच्या मुलीसह २० महिलांशी लग्न केल्याचा दावा या माणसाने केला आहे. त्याने लग्न केलेल्या बहुतांश मुली अल्पवयीन असल्याचीही माहिती हाती येत आहे.

या माणसाचं नाव सॅम्युएल रॅपिली बेटमन असं असून तो ४६ वर्षांचा आहे. तो बहुपत्नीत्व मान्य करणाऱ्या एका गटाचा नेता आहे. फंडामेंटलिस्ट चर्च ऑफ जिजस ख्रिस्त ऑफ लॅटर डे सेंट्स, असं या गटाचं नाव आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, बेटमनने जेव्हा या लहान गटाचं नेतृत्व स्विकारलं, तेव्हापासून म्हणजे २०१९ पासून तो स्वतःला प्रेषित मानू लागला.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

याचवेळी त्याने स्वतःच्या किशोरवयीन मुलीसोबत लग्न करण्याची घोषणा केली. या ४६ वर्षीय बेटमनने आत्तापर्यंत २० महिलांशी लग्न केलं आहे. यातल्या बहुतांश मुली अल्पवयीन, १५ वर्षे वयापेक्षाही लहान आहेत. सध्या त्याला अटक करण्यात आली असून अरिझोना तुरुंगात डांबण्यात आलं आहे. तसंच त्याच्या कोलोरॅडो शहरातल्या दोन घरांची झडती घेतली जात आहे.

टॅग्स :global news