esakal | स्कायडायव्हींग करताना केलं प्रपोज; मुलीच्या प्रतिक्रियेने जिंकली नेटकऱ्यांची मने

बोलून बातमी शोधा

viral video}

एका व्यक्तीने प्रपोज करण्यासाठी अशी पद्धत वापरली आहे ज्याने सर्वांचं हृदय जिंकलं आहे.

स्कायडायव्हींग करताना केलं प्रपोज; मुलीच्या प्रतिक्रियेने जिंकली नेटकऱ्यांची मने
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करताना भीती ही वाटतेच. मात्र, तरीही आपलं प्रपोज अविस्मरणीय ठरावं यासाठी अनेक लोक बऱ्याच हटके गोष्टी करत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नसतो. काही वेळा याप्रकारचे प्रपोज पाहून हसायला येतं तर काहीवेळा आश्चर्यचकीत व्हायला होतं. मात्र, एका व्यक्तीने प्रपोज करण्यासाठी अशी पद्धत वापरली आहे ज्याने सर्वांचं हृदय जिंकलं आहे. या प्रियकराने आपल्या प्रियसीला चक्क हवेत प्रपोज केलं आहे.  

हेही वाचा - राज्यसभा आणि लोकसभा टीव्ही एकत्र; आता 'संसद टीव्ही' नावाचं एकच चॅनेल

होय! आपल्या प्रियसीला प्रपोज करण्यासाठी हा व्यक्ती गर्लफ्रेंडला घेऊन स्कायडायव्हींग करण्यासाठी गेला. या हटके प्रपोजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दिसतंय की, जमीनीपासून हजारो उंचीवर प्रियकर आणि प्रियसी स्कायडायव्हींग करत आहेत. त्यावेळी प्रियकराने दातांमध्ये अंगठी पकडली आहे. त्यानंतर ती रिंग तो हातामध्ये घेऊन गर्लफ्रेंड समोर धरुन तिला माझ्याशी लग्न करशील का, असं विचारतो. जेंव्हा ती सुखद धक्क्याने हो म्हणते तेंव्हा त्या प्रियकराची रिऍक्शन बघण्यासारखी आहे. या व्हिडीओला 27 फेब्रुवारीला शेअर केलं गेलं आहे. जवळपास 38,000 हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.