...म्हणून स्वतःचे कान कापून ठेवले बरणीत

वृत्तसंस्था
Thursday, 27 August 2020

एक व्यक्ती शरीरावर सतत शस्त्रक्रिया करत असून, आता स्वतःचे कान कापून बरणीमध्ये भरून ठेवले आहेत. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सँड्रो असे त्या व्यक्तीचे नाव असून, त्याने आतापर्यंत 17 वेळा सर्जरी करून घेतल्या आहेत.

बर्लिन (जर्मनी): एक व्यक्ती शरीरावर सतत शस्त्रक्रिया करत असून, आता स्वतःचे कान कापून बरणीमध्ये भरून ठेवले आहेत. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सँड्रो असे त्या व्यक्तीचे नाव असून, त्याने आतापर्यंत 17 वेळा सर्जरी करून घेतल्या आहेत.

कर्मचाऱयाच्या मृतदेहासाठी कंपनीने खर्च केले 50 लाख!

सँड्रो (वय 39) याची सोशल मीडियावर Mr. Skull Face या नावाने ओळख आहे. शरिरावर सतत चित्र-विचित्र सर्जरी करून घेत असल्यामुळे तो कायमच चर्चेचा असतो. पण, सध्या त्याने कान कापून ठेवल्यामुळे अधिकच चर्चेत आला असून, लूक व्हायरल होत आहे. शरिरावर शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. कानांची आठवण राहावी म्हणून त्याने फेकून न देता बरणीत शोपीस म्हणून ठेवले आहेत.

सँड्रो हा मूळचा जर्मनीचा असून, त्याला लहानपणापासून शरिरात बदल करण्याचा छंद जोडला आहे. त्याने कपाळ, हात आणि जिभेवर अनेक सर्जरी करून घेतल्या आहेत. त्याने सांगितले की, 'माझ्या शरीरात केलेले बदल माझ्या आयुष्यावर परिणाम करतात. पण, मला फरक पडत नाही. नागरिकांनी माझा स्वीकार एक व्यक्ती म्हणून करावा. माझ्या या लुकमुळे मला काम मिळणे कठीण झाले आहे. अनेक कंपन्या अजूनही जुन्या पद्धतीचा विचार करतात. माझ्या लूकवर टीका करतात. माझा लुक अनेकदा नागरिकांना घाबरवतो. पण काहींना तो इंटरेस्टिंग देखील वाटतो. यातूत मी मानसिक रित्या अजूनच सक्षम होतो'.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man removes ear for modification did 17 surgeries video viral