Video : अंगावर वीज पडताना सीसीटीव्हीत कैद; पण...

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

एक व्यक्ती कुत्र्यांना फिरवत असताना त्याच्या अंगावर वीज पडली. वीज पडत असतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

टेक्सासः एक व्यक्ती कुत्र्यांना फिरवत असताना त्याच्या अंगावर वीज पडली. वीज पडत असतानाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र, नागरिकांनी तत्काळ मदत केल्यामुळे संबंधित नागरिकाचा जीव वाचला आहे.

अलेक्स कोरीस हे तीन ऑक्टोबर रोजी तीन कुत्र्यांना घेऊन मेयेर पार्कमध्ये फिरत होते. यावेळी त्यांच्या पायावर वीज कोसळून मोठा आवाज झाला. वीज अंगावर पडल्यामुळे अलेक्स खाली कोसळून बेशुद्ध पडले व कुत्र्यांनी पळ काढला. मात्र, आवाजामुळे नागरिकांचे अलेक्स यांच्याकडे लक्ष गेले. नागरिकांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. अलेक्स हे गंभीर जखमी झाले असले तरी त्यांचा जीव वाचला आहे.

अलेक्स यांच्या अंगावर वीज पडत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण अवाक झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man struck by lightning had shoes at texas video goes viral