Fact Check: कोरोनाग्रस्त मित्राला वाचवू शकला नाही पैसा, मग काय त्यानं उधळले डॉलर?

न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरसमोर पैसे उधळणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता
 man tossing money
man tossing moneySakal Media

न्यूयॉर्क- न्यूयॉर्कच्या टाईम स्क्वेअरसमोर पैसे उधळणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. सोशल मीडियावर दावा करण्यात आला होता की, ''एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. मरण्याआधी त्याने आपल्या मित्राला सांगितलं होतं की, त्याच्या मृत्यूनंतर रस्त्यावर पैसे उधळले जावेत, जेणेकरुन लोकांना कळेल की तुमच्या आरोग्याच्या तुलनेत जगात कशाचीही किंमत जास्त नाही.''

व्हिडिओमध्ये व्यक्ती म्हणत आहे की, तो आपला मित्र जो कुशच्या आठवणीत पैसे उधळत आहे. हजारो फेसबुक आणि ट्विटर युजर्संनी या व्हिडिओला शेअर केले होते. GOQii चे सीईओ विशाल गोंडाल यांनी 15 एप्रिलला एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये दावा करण्यात आला होता की, व्यक्तीने आपल्या मित्राच्या आठवणीत पैसे उघळले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मित्रानेच असं करण्यास सांगितलं होतं. आरोग्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही, हे यातून त्याला दाखवून द्यायचं होतं.

 man tossing money
कोरोना रुग्णांची संख्या अडीच लाखाच्या पुढे ते चीनविरोधात जपान-अमेरिका एकत्र

कोरोनाशी संबंधित नाही व्हिडिओ

Alt News ने दावा केलाय की, या व्हिडिओचा कोरोनाची काहीही संबंध नाही. हा व्हिडिओ 2020 मधील आहे. तपासात कळालं की, 'द गोड जो कुश' यूट्यूब चॅनेलने हा व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओमध्ये पैसे उधळणाऱ्या व्यक्तीचे नाव मकसूद ट्रॅक्स अगदजानी आहे. ट्रॅक्सने आपला अमेरिकन मित्र जो कुश याच्या आठवणीत पैसे उधळले होते. ट्र्रॅक्स व्हिडिओमध्ये आपल्या मित्राच्या मृत्यूचं कारण सांगत नाही. तो म्हणतो की, जो कुश चांगले पैसे कमावत होता. पण, कोणत्याही कारणाशिवाय त्याला मारण्यात आले. त्याचे कुटुंबीय हे पाहात असतील, तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.

जो कुश मार्च 2020 पासून सोशल मीडियावर अॅक्टिव नाही. त्यामुळे अशी अफवा पसरली की, त्याची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. असे असले तरी त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही. व्हायरल व्हिडिओ या वर्षाच्या सुरुवातीला TraxNYC डायमंड ज्वेलरीकडून अपलोड करण्यात आला होता. या न्यूयॉर्क बेस्ड कंपनीची स्थापना मकसूद ट्रॅक्स अगदजानी यांनीच केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com