बापरे, भयानकचं! पोस्टमार्टम सुरु केले, पायही कापला अन् उठला ना मृतदेह रडत

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

त्याचा पाय कापला जात असतानाच शवागारामध्ये तो अचानकच शुद्धीवर आला. 

केनिया : वैद्यकीय दुर्लक्षाच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केनियात डॉक्टरांनी ज्या व्यक्तीला मृत घोषित केले होते, तो व्यक्ती चक्क उठून बसल्याची घटना घडलीय. विशेष म्हणजे ही घटना तेंव्हा घडलीय जेंव्हा त्याच्या शरीरातून रक्त काढून घेतलं जात होतं. पीटर किगेन असं या व्यक्तीचं नाव आहे. तो 32 वर्षांचा आहे. त्याचा पाय कापला जात असतानाच शवागारामध्ये तो अचानकच शुद्धीवर आला. मिळालेल्या माहितीनुसार, पीटर पोटाच्या आजाराने त्रस्त होता. त्याला केरीको येथील कॅपलेटॅट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. मात्र, त्याचा भावाने म्हटलं की नर्सने आमच्या कुंटुबाला त्याचा मृत्यू झाल्याचे कळवले होते.

हेही वाचा - 43 कामगारांना रस्सीने बांधलं, गळा चिरला, आठ जण बेपत्ता; 'बोको हराम'चा निर्दयीपणा कायम

पीटरच्या भावाने एका स्थानिक वृत्त वाहिनीला सांगितले की, नर्सने मृतदेहाला शवागारात नेण्याआधी माझ्या हातात कागदपत्रे दिली. पीटरला मृत घोषित केल्यानंतर त्याचा मृतदेह हॉस्पिटलमधील शवगृहात लगेचच नेण्यात आला. तिथे त्याच्या विच्छेदनाची प्रक्रिया होणार होती. पण शवविच्छेदनाआधी जेव्हा कर्मचारी त्याच्या शरीरातून रक्त काढण्यासाठी तयारी करत होते, तेंव्हा त्यांना समजलं की तो जिवंत आहे. पीटर परत शुद्धीवर आला आणि त्याने असह्य वेदनांनी रडण्यास सुरवात केली. एक मेलेला व्यक्ती जिवंत कसा झाला, असा विचार करुन तिथले कर्मचारी पळून गेले. 

हेही वाचा -  शत्रूंना त्यांच्याच देशात जाऊन संपवणारी इस्त्राईलची 'मोसाद'; इराणी अणु शास्त्रज्ञाच्या हत्येने पुन्हा चर्चेत
त्यानंतर कालांतराने त्याला पुन्हा प्रथमोपचार देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. पीटरचा भाऊ म्हणाला की आम्हाला शवागारात बोलवले गेले. तिथे तो हालचाल करताना दिसला. आम्हाला धक्का बसला. पण जिवंत असलेल्या माणसाला मृत घोषित करुन ते शवागृहात कसे काय आणू शकतात? असा प्रश्न करुन आता पीटरचे कुंटुबिय हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तक्रार करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man wakes from dead screams in morgue during blood drain